पारनेर / माळकूप माळकूप येथील जागृत देवस्थान श्री हनुमानरायांचा अखंड हरीनाम सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. रामभक्त हनुमान व श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिरात गुरुवर्य ह.भ.प. श्री ररेश महाराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने व आशिर्वादाने चैत्र शु. ८॥ मंगळवार १६ / ४ / २०२४ते चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती मंगळवार दिनांक २३/४/२०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेला होता. तरी माळकूप पंचक्रोशितील माळकूप गावातील सर्वच महिलावर्ग. तरुण वर्ग. जेष्ठ मंडळी. या सप्ताहाच्या कार्यक्रमात उपस्थित राहुन या ज्ञानदानाचा तन मन धनाने लाभ घेतलेला आहे. दैनंदिन कार्यक्रम रूपरेषा खालीलप्रमाणे होती. काकडा भजन पहाटे ४ते६ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी ८ ते १२ वा. हरीपाठ सायंकाळी ५ ते ६ वा व रात्री हरीगजर मंगळवार दिनांक २३ /४ / २०२४ रोजी भागवताचार्य ह.भ.प. रमेशनंदजी महाराज जाधव चेडगांवकर ( राहुरी) यांचे सकाळी ९ ते ११ वा. काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद संप्पन झाला. गायनाचार्य - श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था, निमगांव वाघा. ता. जि. अहिल्यानगर आपले नम्र स...