श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
पारनेर / माळकूप
श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे बुधवारी १० एप्रिल स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. स्वामी भक्ता हो .....
श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शु २ या मुहूर्तावर प्रकट झाले. आणि भिऊ नकोस मि तुझ्या पाठीशी आहे. असे अभिवचन देत प्रत्येक क्षणी स्वामी भक्तांच्या पाठीशी उभे राहिले.
श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकुण कार्यकाळ ४० वर्षाचा आहे. त्या पैकी २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके १८०० मध्ये संप्पन झाले. पण तिन महिन्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज काशी ( वाराणशी ) येथे प्रकट झाले.
स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी स्वामींचा अभिषेक झाल्यापासुन स्वामींच्या दर्शनासाठी व प्रसादासाठी जिल्हाभरातून स्वामी भक्तांची गर्दी आढळून आली. स्वामी चरणी लिन होण्यासाठी स्वामी प्रकट दिन स्वामी भक्तांसाठी खरचं एक आनंदाचा क्षण ठरलेला आहे. माळकूप येथील सर्वच स्वामीभक्त तरुन युवा वर्ग कायम स्वामींच्या कार्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतो.
स्वामींच्या प्रकट दिना निमित्त बुधवारची कार्यक्रम रुपरेषा खालील प्रमाणे होती.
पहाटे ५ वाजता कावड व जल अभिषेक
पहाटे ५ः ३० वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अभिषेक व वस्त्राअलंकार पुजा
सकाळी १० वाजता पालखी प्रदक्षिणा माळकूप
सकाळी ११ वाजता होमहवन संप्पन
दुपारी १२:३० वाजता आरती संप्पन
दुपारी २ ते ४ भजनसंध्या संप्पन
दुपारी ४ : ३० ते ६ः ३० किर्तन संध्या संप्पन
किर्तन सेवा - ह.भ.प. बाळकृष्ण महाराज ताहराबाद
स्वामींचे मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट व फुलांनी मंदिर सजवलेले होते. स्वामींच्या मंदिराबाहेर आकर्षक रांगोळी काढलेली होती. स्वामींच्या मंदिराबाहेर सर्वच स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या स्वामीभक्तांसाठी भव्यदिव्य असा मंडप टाकलेला होता.
व स्वामींचा प्रकट दिन सोहळया निमित्ताने दिवसभर माळकूप येथील स्वामीभक्त श्री ताराचंद प्रभु चत्तर यांचा खिचडी प्रसाद होता. व भाळवणी येथील एक यशस्वी उद्योजक व स्वामी भक्त श्री विजुशेठ कुलथे ( विजय ज्वेलर्स ) यांच्या तर्फे संध्याकाळी ७ः ३० वाजता स्वामींची महाआरती व महाप्रसाद आयोजन केले होते. तरी जिल्हाभरातून गावातील पंचक्रोशीतील सर्वच स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शनाचा लाभ व महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे.
शब्दांकन
श्री शिवशंकर शिंदे
पारनेर न्युज एक्सप्रेस
Comments
Post a Comment