Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

असा रवि पुन्हा होणे नाही. रविंद्र भनगडे यांस अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली

📍पारनेर / भनगडेवाडी 😢निशब्द 💐 असा रवि पुन्हा होणे नाही 💐 रविभाऊला अखेरची भावपुर्ण श्रद्धांजली💐 मनाला न पटणारी घटना नियतिच्या खेळापुढे आम्ही निशब्द  रविवार दिनांक २३ रोजी जुन सकाळी धक्कादायक बातमी समोर आली  ९ : ३० वाजता नगर - कल्याण हायवे वरती भनगडेवाडी येथे श्री रविंद्र गुजाभाऊ भनगडे यांचे अपघाती निधन झाले. भनगडेवाडी पंचक्रोशित बातमी समजताच थोडा वेळ हृदय  अचानक बंद पडल्यासारखे झाले. परीसरातील सुमारे ३००च्या आसपास युवा वर्ग घटनास्थळी जमा झाला. नातेवाईक मित्र परिवार रविंद्र भनगडे यांचे सर्व नातेवाईक जमा झाले. विश्वासच बसेना न घडणारी घटना घडली आणि एकच बातमी समोर आली रविभाऊ काळाच्या पडद्याआड गेला. दुःखाचा डोंगर कोसळला भनगडेवाडीचे माजी सरपंच डॉक्टर राजेश भनगडे हे स्वताः त्यांचा मित्र परिवार माळकूपचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे माळकूपचे सरपंच श्री संजय काळे हे घटनास्थळी दाखल झाले. आणि सर्वात महत्वाचे रविभाऊचे मेहुने श्री अभय भिसे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव हे रविभाऊचे मेन आधारस्तंभ होते. रविभाऊचे मामा डॉक्टर श्री सुरेश भागाजी शिंदे यांनी सुद्धा रविभाऊसाठ...

भाळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार भाऊसाहेब चेमटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला

📍पारनेर / भाळवणी  भाळवणी येथील कायम समाजाच्या निगडीत असलेले व कायम आपलं आयुष्य समाजकार्यासाठी दिलेले सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार भाऊसाहेब चेमटे यांना येत्या वर्षाचा सरपंच संघटीत चळवळीचे नेते श्री बाबासाहेब पावसे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यातील दिला जाणारा १ जुलै रोजी समर्थ संकुल येथे होणारा  राज्यस्तरीय  समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री नंदकुमार चेमटे यांचे सर्वच म्हणजे सामाजिक, धार्मिक, राजकिय स्तरातून अभिनंदन होत आहे. माळकूप येथील सरपंच सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष व माळकूपचे युवा सरपंच श्री संजय शंकर काळे यांनी सुद्धा श्री नंदकुमार भाऊसाहेब चेमटे यांचे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व  सरपंच सेवा संघाचे सर्वेसर्वा श्री बाबासाहेब पावसे पाटील यांच्या वतीने आभार मानले. व भाळवणी येथील श्री संतोषशेठ चेमटे मित्र परिवार , सुभाषदादा रोहोकले मित्र परिवार निशिकांत रोहोकले मित्र परिवार, बबलुशेठ रोहोकले मित्र व माळकूपचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे मित्र परिवार कायम त्यांच्या सोबत असतो. व सरपंच श्री संजय काळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व प्रत्येक...

वृक्ष लागवड तालुक्यात मोठा उत्सव व्हावा - सुजित झावरे पाटीलवासुंदे येथे देवकृपा फांउडेशनच्या वतीने वृक्षारोपनण कार्यक्रम

📍पारनेर / वासुंदे विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड ही मानवाच्या भावी काळातील अधोगतीची चाहूल आहे. कळतयं सगळ्यांना पण सोयीस्कर दुर्लक्ष आपण या गोष्टीकडे करतोय. विशेषत : शहरात मोठ्या इमारती. रस्ते. सुशोभिकरण या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड ही आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलेला शाप ठरणार आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुजितराव झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. वासुंदे येथे देवकृपा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. पारनेर तालुक्यामध्ये देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही येत्या काळात दहा हजारापेक्षा जास्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. त्याची सुरवात आज वासुंदे येथुन आम्ही केली आहे. हा उपक्रम पारनेर तालुक्यात उत्सव व्हावा या सदर उपक्रमात आवळा. बोखर . कडीपता. कडुलिंब. चिंच. आंबा. अर्जुन साताडा. जांभळ. वड. शिसु. कांचन. पिवळ व वनऔषधी वनस्पतींची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. असे ही यावेळी सुजितराव झावरे पाटील यांनी बोलतांना सां...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती येथे इयत्ता १ली मध्ये दाखल झालेले नवागत विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्वच विद्यार्थांचे स्वागत

📍पारनेर /माळकूप  आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती ( माळकूप ) येथे दिनांक १५ /६ / २०२४ नविन शैक्षणिक वर्ष अत्यंत आनंदी वातावरणात सुरु झाले आहे.  त्या साठी शाळेतील सर्वच विद्यार्थांना शिक्षकांतर्फे व पालकांन तर्फे व ग्रामस्थांन तर्फे गोड गोड शुभेच्छा दिल्या. १५/६/२०२४ शनिवार हा शाळेचा पहिला दिवस होता. इयत्ता १ली मध्ये दाखल झालेले सर्व नवागत विद्यार्थांचे शिक्षकांन तर्फे व शाळा व्यवस्थापण समिती तर्फे स्वागत करण्यात आले. व १ली ते ४ थी पर्यंत शिकत असलेले सर्व विद्यार्थांना पाठयपुस्तक वाटप करण्यात आले. व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. या प्रसंगी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व पालक उपस्थित होते.  आणि आज खरं पाहता शाळेचा पहिला दिवस होता. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता पाहण्यास मिळाली. इनामवस्ती परीसरातील सर्व मुलं अगदी आनंदाने शाळेत उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील इनामवस्ती शिक्षक सौ. पुराने मॅडम व सौ. पट्टेकर मॅडम कायम आपल विद्यार्थांबद्दल  शिक्षणविषयी असो किवा सांस्क...

सकल माळी समाज ट्रस्टची जब्मो कार्यकारणी जाहीर

📍अहिल्यानगर / पारनेर न्युज एक्सप्रेस  सकल माळी समाज ट्रस्टची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत सकल माळी समाज ट्रस्टची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सकल माळी समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री किशोर डागवाले साहेब उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भुजबळ सचिवपदी श्री राजेंद्र पडोळे यांची सर्वानुमते मते निवड करण्यात आली.  कार्यकारणी पुढील प्रमाणे विश्वस्त - श्री.किशोर डागवाले साहेब , श्री बाळासाहेब भुजबळ,श्री राजेंद्र पडोळे,श्री भगवान फुलसौंदर ,श्री अनिल बोरुडे,श्री माणिकराव विधाते,श्री धनंजय जाधव,श्री डॉक्टर रणजीत सत्रे,श्री विनोद पुंडसल्लागार (कोअर कमिटी ) ,श्री बाळासाहेब बोराटे,श्री शरद झोडगे,श्री अभय आगरकर,श्री अंबादास गारुडकर,दत्ता जाधव,श्री संतोष लोंढे,श्री संतोष म्हस्के,श्री प्रकाश शिंदे,श्री अर्जुन बोरुडे,श्री अनिल इवळे ,अमोल भांबरकर, वैद्यकीय समिती - डॉक्टर अभिजीत शिंदे,डॉक्टर संदीप कळमकर,डॉक्टर अमोल जाधव,डॉक्टर संदीप नगरे,डॉक्टर जेजुरकर,डॉक्टर दामोदर कळमकर,डॉक्टर कैलास मेहत्रे,डॉक्टर अभिजीत बोरुडे,डॉक्टर योगिता सत्रे,दत्ता गाडळकर,सागर फुलसौंदर, कायदेशीर सल्लागार समिती - ॲड महे...

माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

📍माळकूप / पारनेर  माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या.  त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ...

ऐतिहासिक क्षण - राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

नवी दिल्ली / राष्ट्रपती भवन  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने 294 जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले. त्यामुळे सशक्त भारताचे कणखर व खंबीर नेतृत्वआज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते.  याच बरोबर देशभरातील कला. क्रिडा. उद्योग आणि इतर महत्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थित होते  शब्दांकन  शिवशंकर शिंदे  पारनेर - न्युज एक्सप्रेस

माळकूप येथील गंगाराम शिंदे यांचे निधन

पारनेर / माळकूप  माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व हरपल्याने माळकूप करांना व शिंदे परिवार नातेवाईक यांना हळहळ व्यक्त होत आहे. कै. गंगाराम शिंदे यांचा जन्म माळकूप येथील सर्वसामान्य शिंदे परिवारात झाला. प्रचंड जिद्द चिकाटी त्यांच्यात होती.  त्याच बळावर नगर येथील एमआयडीसीत खाजगी कारखान्यात काम करतांना त्यांनी स्वताः चा उद्योग व्यवसाय उभारला प्रतिकुल परस्थितीत दोन मुले किशोर शिंदे आणि सचिन शिंदे यांचे उच्च शिक्षण पुर्ण केले.  दोन्ही ही मुले आज पुण्यात आयटी क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. नौकरी व्यवसायानिमित्त मुले पुण्यात स्थिरावल्यानंतर काही वर्षापासून कै. गंगाराम शिंदे हे देखील आळंदीत रहिवाशी झाले. परंतु आपल्या मायभुमीप्रती त्यांचे प्रेम ओढ कायम होती. सर्वच नातेवाईकांविषयी  त्यांना आत्मीयता होती. सर्वांच्याच सुख - दुखाः त ते सहभागी होत. कुटुंबात ते थोरले असल्याने या काळात देखील त्यांनी शेवटपर्यंत एकत्रित कुटुंब व्यवस्था सांभाळली.  अध्यात्मिक वारसा जतन केलेल्या कै. गंगाराम शिंदे यांनी...