पारनेर / माळकूप
माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व हरपल्याने माळकूप करांना व शिंदे परिवार नातेवाईक यांना हळहळ व्यक्त होत आहे.
कै. गंगाराम शिंदे यांचा जन्म माळकूप येथील सर्वसामान्य शिंदे परिवारात झाला. प्रचंड जिद्द चिकाटी त्यांच्यात होती.
त्याच बळावर नगर येथील एमआयडीसीत खाजगी कारखान्यात काम करतांना त्यांनी स्वताः चा उद्योग व्यवसाय उभारला प्रतिकुल परस्थितीत दोन मुले किशोर शिंदे आणि सचिन शिंदे यांचे उच्च शिक्षण पुर्ण केले.
दोन्ही ही मुले आज पुण्यात आयटी क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत.
नौकरी व्यवसायानिमित्त मुले पुण्यात स्थिरावल्यानंतर काही वर्षापासून कै. गंगाराम शिंदे हे देखील आळंदीत रहिवाशी झाले. परंतु आपल्या मायभुमीप्रती त्यांचे प्रेम ओढ कायम होती. सर्वच नातेवाईकांविषयी त्यांना आत्मीयता होती. सर्वांच्याच सुख - दुखाः त ते सहभागी होत. कुटुंबात ते थोरले असल्याने या काळात देखील त्यांनी शेवटपर्यंत एकत्रित कुटुंब व्यवस्था सांभाळली.
अध्यात्मिक वारसा जतन केलेल्या कै. गंगाराम शिंदे यांनी पंढरपुर आळंदीची पायी वाऱ्या केल्या. पांडुरंगाचे निस्मिम भक्त होते. काही वर्षापासुन ते आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत चढ - उतार होत होता. परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी काही काळ आजारावर मात केली. मात्र आजार बळावत गेल्यानंतर अखेर रविवारी त्यांचे निधन झाले. शौकाकुल वातावरणात माळकूप येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शब्दांकन
शिवशंकर शिंदे
पारनेर न्युज एक्सप्रेस
Comments
Post a Comment