जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती येथे इयत्ता १ली मध्ये दाखल झालेले नवागत विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्वच विद्यार्थांचे स्वागत
📍पारनेर /माळकूप
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवस्ती ( माळकूप ) येथे दिनांक १५ /६ / २०२४ नविन शैक्षणिक वर्ष अत्यंत आनंदी वातावरणात सुरु झाले आहे.
त्या साठी शाळेतील सर्वच विद्यार्थांना शिक्षकांतर्फे व पालकांन तर्फे व ग्रामस्थांन तर्फे गोड गोड शुभेच्छा दिल्या. १५/६/२०२४ शनिवार हा शाळेचा पहिला दिवस होता. इयत्ता १ली मध्ये दाखल झालेले सर्व नवागत विद्यार्थांचे शिक्षकांन तर्फे व शाळा व्यवस्थापण समिती तर्फे स्वागत करण्यात आले. व १ली ते ४ थी पर्यंत शिकत असलेले सर्व विद्यार्थांना पाठयपुस्तक वाटप करण्यात आले. व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. या प्रसंगी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व पालक उपस्थित होते.
आणि आज खरं पाहता शाळेचा पहिला दिवस होता. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता पाहण्यास मिळाली. इनामवस्ती परीसरातील सर्व मुलं अगदी आनंदाने शाळेत उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील इनामवस्ती शिक्षक सौ. पुराने मॅडम व सौ. पट्टेकर मॅडम कायम आपल विद्यार्थांबद्दल शिक्षणविषयी असो किवा सांस्कृतीक कार्यक्रम असो आपल कर्तव्य अतिषय उत्कृष्टप्रकारे बजावत असतात. यात त्यांना विद्यार्थांच्या पालकांची साथ मोलाची ठरलेली असते. मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेचे नाव मोठं करण्यासाठी यांचे खुप मोलाचे योगदान ठरलेले आहे.
त्यामुळे या दोन्ही ही शिक्षकांचे मनापासून आभार व धन्यवाद.
📍शब्दांकन
✍️शिवशंकर शिंदे / माळकूप
〽️पारनेर/ न्युज एक्स्प्रेस
📱 मो - नंबर - 9764972647
Comments
Post a Comment