वृक्ष लागवड तालुक्यात मोठा उत्सव व्हावा - सुजित झावरे पाटीलवासुंदे येथे देवकृपा फांउडेशनच्या वतीने वृक्षारोपनण कार्यक्रम
📍पारनेर / वासुंदे
विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड वृक्षतोड ही मानवाच्या भावी काळातील अधोगतीची चाहूल आहे.
कळतयं सगळ्यांना पण सोयीस्कर दुर्लक्ष आपण या गोष्टीकडे करतोय. विशेषत : शहरात मोठ्या इमारती. रस्ते. सुशोभिकरण या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड ही आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलेला शाप ठरणार आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुजितराव झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. वासुंदे येथे देवकृपा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. पारनेर तालुक्यामध्ये देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही येत्या काळात दहा हजारापेक्षा जास्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. त्याची सुरवात आज वासुंदे येथुन आम्ही केली आहे. हा उपक्रम पारनेर तालुक्यात उत्सव व्हावा या सदर उपक्रमात आवळा. बोखर . कडीपता. कडुलिंब. चिंच. आंबा. अर्जुन साताडा. जांभळ. वड. शिसु. कांचन. पिवळ व वनऔषधी वनस्पतींची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. असे ही यावेळी सुजितराव झावरे पाटील यांनी बोलतांना सांगितले. वासुंदे येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रणजित पाटील , शरद पाटील , भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे , चेअरमन नारायण झावरे , व्हा. चेमरमन रा. ब झावरे , दिलीप पटोळे , बाळासाहेब झावरे , पोपटराव झावरे , लहानभाऊ झावरे, पोपटराव हिंगडे, शांताराम झावरे, विलास हिंगडे , लक्ष्मण झावरे , स्वप्निल झावरे, डॉ. प्रसाद झावरे , दत्तात्रय बर्वे , रामचंद झावरे, पोपटराव बर्वे , निखिल दाते , शंकर झावरे , गणेश झावरे , मनोज झावरे , संग्राम झावरे , मारूती उगले सर , अमोल पोटघन , विकास झावरे , सुरेश शिंदे, बाळासाहेब झावरे , अशोक झावरे, साधना जगदाळे, उज्वला हिंगडे, शिवाजी गायखे , मछिंद्र झावरे , अशोक बर्वे , पंढरीनाथ हिंगडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात उपस्थित होते.
सुजित झावरे पाटील यांचा संकल्प :
वृक्षारोपण हे संवर्धन हे अत्यंत काळानुरुप गरजेचे आहे. हे ओळखुन देवकृपा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतुन पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये दहा हजारांहून जास्त वृक्षांची लागवड करण्याचा माणस या वर्षे व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाला वासंदे येथुन सुरवात झाली.
✍️ शब्दांकन
शिवशंकर शिंदे - माळकूप
📍पारनेर/ न्युज एक्सप्रेस
📱 मो नं - 9764972647
Comments
Post a Comment