Skip to main content

ऐतिहासिक क्षण - राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

नवी दिल्ली / राष्ट्रपती भवन 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने 294 जागा जिंकत काठावरचे बहुमत मिळवले. त्यामुळे सशक्त भारताचे कणखर व खंबीर नेतृत्वआज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. 
याच बरोबर देशभरातील कला. क्रिडा. उद्योग आणि इतर महत्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थित होते 
शब्दांकन 
शिवशंकर शिंदे 
पारनेर - न्युज एक्सप्रेस

Comments

Popular posts from this blog

माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

📍माळकूप / पारनेर  माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या.  त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ...

श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमीपुजन समारंभ श्री. विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते संप्पन.

📌 पारनेर ( प्रतिनीधी ) माळकूप - पारनेर न्यूज  🛑 श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु. सभामंडपाचे भूमिपूजन समारंभ संपन्न . ✍️ पारनेर तालुक्यातील माळकूप येथे लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान प्रति अक्कलकोट असलेले स्वामी समर्थ देवस्थान येथे गुरुवार दिनांक १० / १० / २०२४ रोजी येथे नवीन सभामंडपाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष श्री विश्वनाथदादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बंडूशेठ रोहोकले ,जिल्हा भाजप कार्यकारणी सदस्य श्री संभाजी आमले ,श्री दीपक रोहोकले ,श्री पोपट लोंढे , जगदीश आंबेडकर, श्री अरुणराव ठाणगे व स्वामी समर्थ देवस्थान येथील माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे ,श्री संभाजी नाबगे ,श्री बबन शिंदे गुरुजी ,श्री भास्कर काळे  आदी मान्यवर व हजारो स्वामीभक्त उपस्थित होते. 🛑  जि प सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांच्याकडून २५१५ - १२३८ ग्रामविकास निधी योजनेतून १५ लक्ष रु. चा निधी सभामंडपासाठी मिळालेला आहे .यापुढील काळातही असेच भरीव योगदान शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणा...

शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावटमध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला

🛑 पारनेर - ( प्रतिनिधी )  भाळवणी - पारनेर न्यूज एक्सप्रेस  🔶 शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त घट सजावट मध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ✍️ पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरीटेबल ट्रस्ट भाळवणी स्व.नानापाटील रोहोकले युवा ग्रामविकास प्रतिष्ठान व दोस्ती युवा ग्रुप आयोजित नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावट मध्ये भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची बहीण शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार श्री निलेशजी लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके यांच्या हस्ते पिठाची गिरणी बक्षीस म्हणून देण्यात आली . भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस मंडळाला अनेक प्रकारचे सहकार्य नियोजन असते व भरघोस बक्षिसांची मदत होते यापुढेही त्यांच्या मदतीचा हात मंडळाला राहणार आहे असेही संतोषशेठ चेमटे यांनी सांगितले . त्या वेळेस भाळवणी येथील श्री बबलूशेठ  रोहोकले, श्री संदीपशेठ कपाळे,  श्री राजेंद्रशेठ च...