पारनेर ( प्रतिनिधी ) शिवशंकर शिंदे अनपेक्षित आणि अतिशय दुःखद आजचा दिवस एका अनपेक्षित आणि अतिशय दुःखद घटनेच्या बातमीने सुरु झाला. आमचे शिंदे परिवाराचे आदर्श मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य मा. श्री गुलाबराव बाबूराव उर्फ जी. बी. शिंदे सर यांचे काल रात्री एक वाजता दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी साडे सहा वाजता मिळाली. व्हाटसॅपवर श्रद्धांजलीचे संदेश सुरु झाले होते पण माझे मन शिंदे सरांच्या आठवणींमध्ये अस्वस्थ येरझाऱ्या मारीत होते. सावताळ बाबा उत्सवात शिंदे सरांचा उत्साह गेली काही वर्षे शिंदे सरांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरु होत्या; पण तरीही आजची त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारी आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ हे सरांचे गाव. या गावात श्री सावताळ बाबांचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. रामनवमी ते हनुमान जयंती या काळात संपन्न होणाऱ्या या उत्सवात शिंदे सरांचा उत्साह अगदी ओसंडून वाहात असे. स्व. श्री वसंतराव लोळगे गुरुजी यांच्यानंतर लेकुरवाळ्या बाया बापड्यांच्या भावनांना हात घालून उत्सवासाठी देणगी...