📍पारनेर ( प्रतिनिधी ) -
अहमदनगर जिल्ह्यातील व पारनेर तालुक्यातील माळकूप इनामवस्ती येथे समजले जाणारे जागृत देवस्थान व हजारो लाखो स्वामीभक्तांचे श्रध्दास्थान
श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकुप
येथे
प्रतिवार्षिक श्री गुरु पौर्णिमा महोत्सव यंदाही अत्यंत भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असा संपन्न झालेला आहे. संपूर्ण दिवसभर धार्मिक व मन प्रसन्न करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी पहाटे पासून रात्री पर्यंत भरगच्च कार्यक्रम झाले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज मुर्ती व श्री पादुका अभिषेक, वस्त्रालंकार पूजा,
स्वामी सेवक श्री किरण पंडित यांनी केलेल्या सामुहिक नामजप सेवेच्या पूर्णाहुती निमित्त महायज्ञ संपन्न झाला आहे. सकाळी १०.३० वा. महायज्ञ पार पडलेला आहे. दुपारी पादुका पालखीत बसवून पालखी सोहळा झालेला आहे. खास गुरु पौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान मध्ये आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती . गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने दिवसभर अनेक स्वामीभक्त स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन गेलेले आहे. लहानंपासून ते थोरांपर्यंत स्वामीभक्त स्वामींच्या परीसरात अगदी मनोभावे सेवा करत होते. दिवसभर येणाऱ्या भाविकांना खिचडीच्या प्रसादाचे नियोजन गोरेगाव येथील स्वामी भक्त श्री प्रमोदजी तांबे यांनी केले होते. तसेच दिवसभर भजन सुरू होते. सायंकाळी स्वामी भक्तांना सेवेचा खराखुरा आनंद देणारा एक सुंदर श्रवणीय स्वर साधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तसेच नियमितपणे श्री स्वामींची महाआरती व अन्नदान सेवा भाळवणी येथील स्वामी भक्त श्री योगेश कुंभकर्ण, श्री रविंद्र रोहोकले ( शिवसमर्थ मेडीकल भाळवणी ), श्री सुमित रोहोकले, श्री प्रदीप बोरुडे यांच्या शुभहस्ते स्वामींची महाआरती व त्या नंतर अन्नदान सेवा पार पडलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे, मुंबई, अहमदनगर येथील स्वामी भक्त व नामधारक सेवेकरी बंधू भगिनी उपस्थित होते. माळकूप येथील सर्वच ग्रामस्थ युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. परीसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच स्वामीभक्तांनी गुरुपौर्णिमेच्या या आनंदात सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून सेवेचा लाभ घेतलेला आहे .
सर्वात शेवटी स्वामी समर्थ देवस्थान व माळकूप ग्रामस्थ यांनी सर्वांचे आभार मानले.
✍️शब्दांकन
शिवशंकर शिंदे / माळकूप
✒️पत्रकार
〽️पारनेर न्युज - मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment