श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे जि. प शाळा इनामवस्ती व अंगणवाडी विद्यार्थांची आशाढी एकादशी निमित्त दुमदुमली पंढरी
📍पारनेर ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे जि. प शाळा इनामवस्ती व अंगणवाडी विद्यार्थांची आषाढी एकादशी निमित्त दुमदुमली पंढरी
💐 💐 💐 💐
अवघाची रंग एक जाहला या गोड अभंग रचनेत थिरकली चिमुकल्या वारकऱ्यांची पाऊले
टाळ वाजे मृदूंग वाजे
वाजे हरीचा वीणा !!
माऊली निघाले पंढरपुरी
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
जि. प. शाळा इनामवस्ती माळकूप व अंगणवाडी विद्यार्थांची आज आषाढी एकादशी निमित्त जि. प शाळा ते स्वामी समर्थ देवस्थान पर्यंत विद्यार्थांची पायी दिंडी चालली सर्व विद्यार्थांनी उत्साह होता. शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम स्वामींचे दर्शन विद्यार्थांने घेतले. स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आषाढी एकादशी निमित्त स्वामींच्या प्रांगणात विठु माऊलींचा अभंग आनंदमयी चालू झाला. विद्यार्थी खुप आनंदाने स्वामींच्या प्रांगणात उत्साहात विठु माऊलींचा खेळ खेळत होते. शाळेचे शिक्षक सौ. पुराने मॅडम व सौ. पट्टेकर मॅडम यांनी आज या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थांसाठी खुप प्रयत्न व परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मंगल जयसिंग नाबगे यांस तर्फे विद्यार्थांना खाऊ स्वरुपात केळी. राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. भाळवणी येथील विराज जनरल स्टोअर्सचे मालक श्री दादा खरमाळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्त विठु माऊलीचा या विद्यार्थांमुळे स्वामींचे प्रांगण व परीसर गजबजून गेले. विद्यार्थी रिंगन महिलांची फुगडी झाली व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️पारनेर न्यूज - एक्सप्रेस व मायभूमी पत्रकार
📱मो नंबर - 9764972647
Comments
Post a Comment