✍️ पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते जनसेवक डॉक्टर श्रीकांत आण्णा पठारे तालुका प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) सदस्य पंचायत समिती पारनेर यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्रतपासनी शिबीर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.
त्यावेळेस भाळवणी येथील डॉक्टर श्री संजय बांडे, डॉक्टर श्री शैलेश लोढा , लक्ष्मण चेमटे ( गुरुजी ) श्री अरुण रोहोकले , श्री संभाजी आमले , श्री युवराज रोहोकले ,ग्रा सदस्य भाळवणी , श्री प्रकाश (पिनु ) रोहोकले युवा सेना जिल्हा उपप्रमुख, संकेत पटेकर ,श्री राहुल चेमटे ( फोटो ग्राफर ) श्री नितीन चेमटे ( गुरुजी ) आदी मान्यवर भाळवणी येथे शिबीरास उपस्थित होते.
डॉक्टर श्रीकांत पठारे यांचा भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या शिबीरात भाळवणी येथील गरीब व गरजु रुग्णांनी सुवर्ण संधीचा लाभ घेतलेला आहे. भाळवणी येथील ज्या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेषन करावे लागणार आहे. त्यांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे. व रुग्णांना ॲम्बुलन्समध्ये ऑपरेशन साठी नेले जाईल. व ऑपरेशन झाल्यानंतर परत भाळवणी गावामध्ये आणुन सोडण्यात येईल असे आश्वासन श्री डॉक्टर श्रीकांत पठारे ( आण्णा ) यांनी भाळवणी येथे बोलतांना सांगितले.
गरीब गरजु व निराधार या रुग्णांसाठी समाजात व तालुक्यात डॉक्टर श्रीकांत पठारे यांचा मोलाचा व मोठा वाटा आहे.
डॉक्टर श्रीकांत पठारे जनतेशी अतिषय प्रेमाणे व मायेने आपुलकिने संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.
डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी बोलतांना सांगितले कि डोळा हा आपला एकदम नाजुक अवयव आहे. गरीब निराधार व गरजु रुग्णांसाठी मि तालुक्यात डोळे तपासणी हे शिबीर आयोजित केलेले आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती पारनेर तालुक्याचे जनसेवक डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी भाळवणी येथे परिसरातील व तालुक्यातील जनतेने घ्यावा.
व सर्वात शेवटी डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी भाळवणी ग्रामस्थांचे आभार मानले.
📍शब्दांकन
✍️शिवशंकर शिंदे / माळकूप
पत्रकार
पारनेर न्यूज एक्सप्रेस
मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment