📍मुंबई : प्रतिनिधी
✍️ सरपंच सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे राज्यभरातून सरपंच आले होते.
यानंतर शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली.
सरपंचांच्या विविध मागण्या - ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सात ते आठ मागण्या मंजुर करण्याचे आश्वासन दिले.
मंत्रालयामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्व सरपंचाने मागण्यांच्या घोषणा देत आझाद मैदान दुमदुमुन टाकले होते. सरपंच सेवा संघाचे नगर जिल्हा अध्यक्ष व माळकूप सरपंच श्री संजय काळे यावेळी उपस्थित होते.〽️
Comments
Post a Comment