माळकूप येथे जनसेवक डॉक्टर श्रीकांत ( आण्णा ) पठारे यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्रतपासनी शिबीर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
📍 पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर तालुक्यातील माळकूप येथे पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते जनसेवक डॉक्टर श्री श्रीकांत आण्णा पठारे तालुकाप्रमुख : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सदस्य - पंचायत समिती पारनेर
पारनेर यांच्या संकल्पनेतुन मोफत नेत्रतपासनी शिबीर व मोफत मोतीबिंदु शस्त्रकिया शिबीर पार पडले.
त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी डॉक्टर श्रीकांत पठारे यांचा माळकूप ग्रामपंचायत व माळकूप ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन माळकूप येथील सेवा सोसायटी माजी चेअरमन श्री कुंडलीक नाबगे ( गुरुजी ) व डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या हस्ते झाले.
डॉक्टर श्रीकांत पठारे यांसोबत आलेले सर्व सहकारी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने छोटासा सत्कार करण्यात आला.
या शिबीरात माळकूप येथील गरीब गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतलेला आहे. माळकूप येथील ज्या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे लागणार आहे. त्यांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे. व रूग्णांना ॲम्बुलन्समध्ये ऑपरेशनसाठी नेले जाईल व ऑपरेशन झाल्यानंतर परत गावामध्ये आणुन सोडण्यात येईल असे डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी बोलतांना सांगितले आहे.
सामाजिक कार्यासाठी डॉक्टर श्रीकांत पठारे यांचा तालुक्यात मोठा मोलाचा वाटा आहे. पारनेर तालुक्यात डॉक्टर श्रीकांत पठारे यांना माननारा वर्ग मोठा आहे. डॉक्टर श्रीकांत पठारे यांना जनतेशी संवाद साधताना खुप प्रेम आपुलकी निर्माण होती.
या शिबीरासाठी सहकार्य डॉक्टर मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशन
मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगांव
असेही बोलतांना डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
माळकूप गावातील ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटी चेअरमन व्हा चेअरमन सदस्य सामाजिक , राजकीय , धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते. महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व सर्वात शेवटी पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते जनसेवक डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी माळकूप गावचे आभार मानले. व कार्यक्रम संप्पन झाला.
📍शब्दांकन
⭕ शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️पारनेर न्यूज व मायभूमी पत्रकार
📱मो नं - 9764972647
Comments
Post a Comment