पारनेर ( प्रतिनिधी )
शिवशंकर शिंदे
अनपेक्षित आणि अतिशय दुःखद
आजचा दिवस एका अनपेक्षित आणि अतिशय दुःखद घटनेच्या बातमीने सुरु झाला. आमचे शिंदे परिवाराचे आदर्श मार्गदर्शक
आदरणीय गुरुवर्य मा. श्री गुलाबराव बाबूराव उर्फ जी. बी. शिंदे सर यांचे काल रात्री एक वाजता दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळी साडे सहा वाजता मिळाली. व्हाटसॅपवर श्रद्धांजलीचे संदेश सुरु झाले होते पण माझे मन शिंदे सरांच्या आठवणींमध्ये अस्वस्थ येरझाऱ्या मारीत होते.
सावताळ बाबा उत्सवात शिंदे सरांचा उत्साह
गेली काही वर्षे शिंदे सरांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरु होत्या; पण तरीही आजची त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारी आहे.
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ हे सरांचे गाव. या गावात श्री सावताळ बाबांचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. रामनवमी ते हनुमान जयंती या काळात संपन्न होणाऱ्या या उत्सवात शिंदे सरांचा उत्साह अगदी ओसंडून वाहात असे. स्व. श्री वसंतराव लोळगे गुरुजी यांच्यानंतर लेकुरवाळ्या बाया बापड्यांच्या भावनांना हात घालून उत्सवासाठी देणगीची मोठी रक्कम उभी करण्यात शिंदे सरांचा सिंहाचा वाटा असायचा. अलिकडच्या काही वर्षात तब्बेतीच्या कारणांमुळे उत्सवातला सरांचा सहभाग कमी झाला होता. गावकऱ्यां आणि उत्सवाला देणगी देऊ इच्छिणाऱ्या लेकुरवाळ्या बाया-बापड्यांना त्यांची उणीव नक्कीच जाणवत असावी, कारण उत्सव काळात शिंदे सरांना घरी जाऊन भेटण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे.
😢माझ्या व्यक्तिगत जीवनात सरांचे महत्त्वाचे स्थान🌸
शिंदे सरांचे शालेय जीवना व्यतिरिक्त माझ्या व्यक्तिगत जीवनातही महत्त्वाचे स्थान आहे, होते आणि ते नेहमीच राहील. माझ्या विवाहाच्या वेळी माळकूप येथील श्री बाळासाहेब शिंदे व शिंदे सरांनी माझ्या विवाहाचा विचार केला व स्वताः शिंदे सर व बाळासाहेब शिंदे व माझे आजोबा श्री भागा धोंडीबा शिंदे गुरुजी यांच्या साक्षीने माझा विवाह संप्पन झाला. नंतर माझे दोन मुले धीरज व मृणाल व माझी पत्नी सौ. सुजाता यांच्यावर शिंदे सरांचे खुप प्रेम व मला कायम जावयाचा मान दिला. माझ्या दोन्ही मुलांना शिंदे सरांनी वेळो वेळी शिक्षनाचे मार्गदर्शन केले व शिंदे सर कायम सांगायचे धीरज आणि मृणाल हे सोनं आहे. जीवणात काही तरी वेगळचं उज्वल भविष्य उज्ज्वल करतील व माळकूपचं नाव व आईवडीलांच नाव मोठं करतील असं शिंदे सर कायम आशिर्वाद रुपी बोलायचं मी अपंग असुन माझं लग्न वडगांव सावताळ येथील ठुबे परिवारातील सुजाता हिच्याशी माझा शुभविवाह लावुन दिला. शिंदे सर मला कायम पप्पु शिवाय बोलत नव्हते .
आमचे आजोबा श्री भागा धोंडीबा शिंदे ( गुरुजी ) यांना व आम्हाला खुप मोठे दुखः झाले. शिंदे सर माझ्यासाठी एक दैवतच होते. मि एकच सांगु इच्छितो मी शिवशंकर शिंदे आहे फक्त शिंदे सरांमुळे , शिंदे सरांच्या आठवणी कायम आमच्या शिंदे परिवाराच्या धीरज शिंदे मृणाल शिंदे आमच्या परिवाराच्या मनात स्मरणात राहतील 😢
निशब्द
*भावपूर्ण श्रद्धांजली!*
मा. गुरुवर्य शिंदे सरांच्या निधनाने शिंदे परिवाराला, विशेषतः ह. भ. प. श्री मिठू महाराज शिंदे यांना झालेल्या पितृशोकाच्या दुःखात आमचा सर्व शिवशंकर शिंदे परिवार माळकूप सहकुटूंब सहभागी आहे. परमेश्वराने दिवंगत शिंदे सरांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी या नम्रप्रार्थनेसह...
💐भावपूर्ण श्रद्धांजली!💐
*शोकाकूल:*
शिवशंकर शिंदे / माळकूप परिवार
संपादक -पारनेर न्युज एक्सप्रेस
मायभूमी - पत्रकार
मो नं - ९७६४९७२६४७
Comments
Post a Comment