Skip to main content

Posts

Showing posts from August, 2024

पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद वारसास तीन लक्ष रुपये अपघात विमा -चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त

📝 पारनेर ( पोखरी )  प्रतिनिधी  ✍️ पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद वारसास ३ लक्ष रुपये अपघात विमा  ✒️ चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त  📰 पारनेर २० ऑगस्ट २०२४ रोजी पोखरी ता पारनेर येथील पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद कै बबन दगडू शिंदे वय वर्ष 55 यांचे 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता पोखरी वरून टाकळी ढोकेश्वर ला बाजार निमित्ताने मुलगा शुभम बबन शिंदे व मयत कै बबन दगडू शिंदे दोघे मोटरसायकल वर येत असताना पोखरी घाट परिसरात समोरील भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप ची धडक होऊन बबन शिंदे यांना डोक्याला गंभीर मार लागून बेशुद्ध झाले होते त्यांना उपचारासाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत असल्याचे सांगितले होते  पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे बबन दगडू शिंदे हे सभासद होते झालेल्या घटनेची माहिती सभासदांच्या वारसांनी व पोखरीतील ग्रामस्थांनी संस्थापक चेअरमन काशिनाथ दाते सर यांना दिली पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सदर घटनेची संपूर्ण माहिती घेतली तसेच संस्था सभास...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश उल्लेखनिय - सभापती काशिनाथ दाते सर

✍️ पारनेर प्रतिनिधी  ( जामगांव )  📝 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश उल्लेखनीय - काशिनाथ दाते सर  🛑 जामगांव सारख्या ग्रामीण भागातील स्पर्धा स्पर्धा परीक्षा उल्लेखनियेतून यश मिळवणाऱ्या विदयार्थांची संख्या अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून विवीध परीक्षेत पास होऊन शासकीय नौकऱ्या मिळवण्यात खेडेगावातील विद्यार्थांची संख्या वाढलेली आहे. असे मत जिल्हा परिषदेचे कृषी आणि बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे जामगांव येथील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सन्मान पारनेर ग्रामीण पतसंस्था परिवाराच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.  जामगांव येथील सुशांत बाबासाहेब फलके याला हैद्राबाद येथील कॉलकॉम आयटी कंपनीत ४० लाख रु. चे वार्षिक पॅकेज मिळाले. तसेच त्याचा लहान भाऊ निरंजन बाबासाहेब फलके याने एमबीबीएस ला प्रवेश  मिळवला. निरंजनचे शिक्षण न्यु आर्टस , कॉमर्स व सायन्स कॉलेज येथे शिक्षण झाले असून त्याचा १२ वी मध्ये नीट परीक्षेत ...

सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते कान्हुर पठार नवलेवाडी येथे पाण्याची टाकी व गारगुंडी येथे शिवरस्ता ५० लक्ष रु. कामांचे भूमिपूजन समारंभ करण्यात आले

✍️ पारनेर - कान्हुर पठार  📍पारनेर न्यूज एक्सप्रेस  ✒️ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नवलेवाडी पाण्याची टाकी व गारगुंडी शिवरस्ता ५०. लक्ष रु. कामांचे भुमीपुजन समारंभ करण्यात आले. आज कान्हूर पठार येथे सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजुर करण्यात आलेल्या नवलेवाडी पाण्याची टाकी तसेच गारगुंडी शिव रस्ता करणे ५०.०० लक्ष रू. विकास कामांचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणराव ठाणगे, सतिश पिंपरकर, सरपंच विलास शेंडकर, बाळासाहेब रेपाळे, संग्राम पावडे, शहाजी कवडे, दत्तोबा ठाणगे, रविंद्र पाडळकर, गोकुळ वाळुंज, चंद्रकांत कुलकर्णी, सुभाष नवले, सहादू नवले, बाळासाहेब पानसरे, बन्सी ठुबे, शिवाजी नवले, दादाभाऊ नवले, विलास नवले, सुभाष ठूबे, बाळू नवले, प्रभाकर नवले, संभाजी नवले, सतिश नवले, श्रीपाद नवले, बाळू नवले, जालिंदर नवले, इंद्रभान नवले, गोकुळ शिंदे, अमोल नवले, योगेश ठूबे, ऋषी ठूबे, प्रकाश नवले, प्रदीप नवले, विलास लोंढे, नामदेव ठूबे, गणेश नवले, सचिन गाडगे, शिवाजी नवले, प्रकाश नवले, रंजन नवले, रवींद्र पारधी, अर्जुन नवले, विक्रम नवले, संपत नवले...

विकासकामे हेच माझे ध्येय - सुजित झावरे पाटील

✍️ पारनेर ( प्रतिनीधी )  पारनेर न्यूज एक्सप्रेस  📝 विकासकामे हेच माझे ध्येय - सुजित झावरे पाटील  नागापूरवाडी ( पळशी )   आज पारनेर तालुक्यातील शेवटचे टोक अतिदुर्गम आदिवासी भाग मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेले  नागापूरवाडी (पळशी)येथे सुजित झावरे पाटील  यांच्या प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या नागापूरवाडी ते काळा माथा रस्ता खडीकरण करणे. १८.०० लक्ष रू. तसेच नागापूरवाडी ते मांडवा रस्ता खडीकरण करणे १८.०० लक्ष ( एकूण ३६.०० लक्ष रू.)  रस्त्याचे भूमिपूजन सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी बोलतांना सुजित झावरे पाटील म्हणाले विकास कामे हेच माझे ध्येय आहे. त्यावेळी  पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, मा. सरपंच मिठू शेठ जाधव, मा. सरपंच संतोष जाधव, इंदुमतीताई मेंगाळ, वामन मधे, विष्णू मधे, शेखरभाऊ साळवे, शंकर साळवे, खमा मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, देवजी मेंगाळ, बारकु मेंगाळ, विजय पथवे, दुर्योधन मेंगाळ, खेमा पथवे, भागा मेंगाळ , तुकाराम मेंगा ळ, पंकज गंडाळ, रामा मधे, नंदू पथवे, राजू पथवे, संतोष बिचकूले, दिनकर ढोकळे, गायखे गु...

माळकूप इनामवस्ती येथे बिबट्याची दहशत प्रशासनानी लवकरात लवकर दखल घ्यावी - बाळासाहेब शिंदे माजी सरपंच

📍पारनेर ( प्रतिनिधी )  माळकूप  माळकूप इनामवस्ती येथे बिबट्याची दहशत प्रशासनानी लवकरत लवकर दखल घ्यावी - बाळासाहेब शिंदे  माजी सरपंच पारनेर तालुक्यातील माळकूप ( इनामवस्ती ) येथे मंगळवारी रात्री सुमारे ८ च्या सुमारास इनामवस्ती येथे बिबट्याची दहशत पाहण्यास मिळाली . इनामवस्ती वरील नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी माळकूपचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी केलेली आहे . रात्री अपरात्री शेतकरी वर्ग आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी जात असतो व सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जावे लागते . उद्या जर काही अनुचित प्रकार येथे घडला तर त्याला जबाबदार कोन अस प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे असं बाळासाहेब शिंदे म्हणाले, त्यामुळे बिबट्याची भितीचे वातावरण झालेले आहे. इनामवस्ती वरील सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांनी बाळासाहेब शिंदे यांना बिबट्यातुन भयमुक्त करावे असे आवाहन केले आहे , चौकट -  माळकूप इनामवस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेत विद्यार्थांना व शिक्षकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभ...

माळकूप येथील श्री विठ्ठल सावळेराम नाबगे (गुरुजी ) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

📍पारनेर - प्रतिनिधी  पारनेर न्यूज एक्सप्रेस  माळकूप येथील श्री विठ्ठल सावळेराम नाबगे ( गुरुजी ) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  🎀 ध्येय उदयोग समुह पुणे व दैनिक ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२४ या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. विठ्ठल सावळेराम नाबगे यांना देण्यात आला . रविवार दिनांक 11/08/2024 रोजीअहमदनगर येथील माऊली सभागृह मध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले . जेष्ठ साहित्यिक व कथाकार श्री . बबन पोद्दार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला . श्री. नाबगे सर सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देसवडे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एकूण सेवा 3४ वर्ष . शैक्षणिक क्षेत्रातील योगदानांबद्दल पुरस्कार मिळाला . धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सुद्धा योगदान . माझ्या शाळेला २०२३ चा जिल्हा परिषद अहमदनगरचा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे . असे हि बोलतांना श्री नाबगे गुरुजी म्हटले  स्पर्धा परीक्षा व क्रिडा स्पर्धा यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले, ⭕शिवशंकर शिंदे  ✍️ संपादक - पारनेर न्य...

आज चिंचोली येथे सजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ५० लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आलेला आहे

⭕ पारनेर ( प्रतिनिधी )  पारनेर न्यूज एक्सप्रेस  आज चिंचोली येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ५० लक्ष रु. निधी मंजुर करण्यात आलेला आहे.  पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे सुजित झावरे पाटील यांनी ५० लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आलेल्या भगतवाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे सदर रस्त्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्त्यासाठी ५०.०० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आलेले आहे. काही महिन्यांपूर्वी चिंचोली भगतवाडा व परिसरातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली होती. यासाठी सुजित झावरे पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून ५०.०० लक्ष रू निधी मंजूर करून आज प्रत्यक्षात भूमिपूजन करून काम सुरु होणार असल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.  यावेळी  लोणी मावळा गावचे सरपंच विलास शेंडकर, पुणेवाडी गावचे मा.सरपंच बाळासाहेब रेपाळे, शहाजी कवडे, अमोल रासकर, सतिश पिंपरकर, जयदीप पिंपरकर, मच्छिंद्र पिंपरकर, बन्सीभाऊ सातपुते...

सावित्री शक्तीपीठ तर्फे किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार

नगर ( प्रतिनिधी )  📍पारनेर न्यूज एक्सप्रेस  सावित्री शक्तीपीठ तर्फे किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार  नगर -भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर झाला आहे  सावित्री शक्तीपीठाच्या  प्रमुख अर्चना कावलकर यांच्या संस्थेने हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे त्यांची घोषणा पुरस्कार समितीचे प्रमुख पुणे येथील दशरथ कुळधरण यांनी केले आहे   *📍शिवशंकर शिंदे* *✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस*  ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब *✒️ पत्रकार - दिव्य जनलोक व मायभूमी*  📱९७६४९७२६४७

आज पळसपूर येथे देवकृपा फाउंडेशनच्या वतीने आयोजित वृक्ष संवर्धन संकल्पने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न करण्यात आला

📌पारनेर ( प्रतिनिधी पळसपुर )  पारनेर न्यूज एक्सप्रेस  आज पळसपूर येथे देवकृपा फाउंडेशन च्या वतीने आयोजित वृक्ष संवर्धन संकल्पनेअंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संप्पन करण्यात आला. आज पळसपूर येथे देवकृपा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत "वृक्ष संवर्धन" संकल्पने अंतर्गत सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते १०० पेक्षा जास्त औषधी झाडांची वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी सरपंच रुपाली वाघमारे, चेअरमन राजेंद्र आहेर सर, दिलिप आहेर, रामदास ढोले, बारकु शिंदे, सतीश आहेर, पंकज आहेर, अभय आहेर, सुरेश आहेर, हरि आहेर, बाळु आहेर, श्रीकांत वाघमारे, नामदेव ढोले, भास्कर ढोले, बाळशिराम आहेर, रावसाहेब आहेर, बबुशा आहेर, रावसाहेब काकडे, वैभव पवार, बंटी आहेर, बंटी वाघमारे, श्रीकांत ढोले, संजय आहेर, रंगनाथ आहेर, भाऊसाहेब आहेर, भाऊसाहेब पाटील, हावशिराम आहेर, हनुमंत पवार, शुभम आहेर, कुणाल आहेर, कैलास ईघे व मान्यवर मंडळी उपस्थितीत होते  📌शिवशंकर शिंदे  संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस  पत्रकार - मायभूमी व...

कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहुलने मिळवले यश : सभापती काशिनाथ दाते सर

📌 पारनेर प्रतिनीधी  पारनेर न्यूज एक्सप्रेस  कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहूलने मिळवले यश :  सभापती काशिनाथ दाते सर  जामगाव ता. पारनेर येथील राहुल गोवर्धन बांगर यांची सन २०२२ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सन्मान केला यावेळी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन आप्पा भुजबळ, बबलू शेठ रोहकले, पारनेर ग्रामीण पतसंस्था जेष्ठ संचालक बाळासाहेब सोबले, मा. चेअरमन एकनाथ धुरपते, ह भ प योगेश महारा शिंदे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.  यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहुलने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. राहुलचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. तेरा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मिळवलेले हे यश निश्चितपणे प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशात आई श्रीमती सविता बांगर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर पप्पू शेठ बांगर व त्यांचा संपूर्ण बांगर परिवार नातेवाईक ग्रामस्थ यांचेही...

सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा लढवावी : किसनराव धुमाळ यांचे झावरेंना साकडे

📍पारनेर ( प्रतिनिधी पारनेर न्यूज एक्सप्रेस )  सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा लढवावी.   किसनराव धुमाळ यांचे झावरेनां साकडे  पारनेर तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून राजकारण करणारे नेतृत्व म्हणून सुजित झावरे पाटील यांची सर्वसामन्यात ओळख आहे.  त्यामुळे विकास कामांच्या जोरावर सुजित झावरे यांनी विधान सभेची निवडणूक लढवावी असे साकडे  किसनराव धुमाळ यांनी सुजित झावरे पाटील यांना घातले आहे.         सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके ज्यांची शिफारस करतील त्यालाच उमेदवारी मिळणार आहे. तर प्रतिस्पर्धी महायुतीकडून सुजित झावरे पाटील यांनीच उभे राहावे अशी धारणा गावोगावच्या झावरे समर्थकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील  यांनी तालुक्यात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे ही निवडणूक विकासावरती लढली जावी अशीच  इच्छा किसनराव धुमाळ यांनी व्यक्त केली आहे....

दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी समिती स्थापन सावली संघटनेचेआंदोलन : दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

📍दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी समिती स्थापन सावली संघटनेचे आंदोलन दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश  - जिल्हा रुग्णालयाच्या लॉगीन आयडीचा वापर करून संशयिरित्या काढलेली दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आढळून आली आहेत. या प्रकरणात पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगडे यांनी सावली दिव्यांग संघटेनेच्या कार्यकर्त्यांना दिले.  मंगळवारी सावली दिव्यांग संघटेनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे यांच्या आश्वासानंतर आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.  उपस्थित मान्यवर या वेळी बाहुबली वायकर युनूस सय्यद सुभाष भावले विश्वनाथ प्रभळकर गोवर्धन वांढेकर बाबासाहेब डोळस चाँद शेख अनिल विघ्ने गौरव राठोड लक्ष्मीकांत राठोड निर्मला भालेकर शारदा गवळी अरुण गवळी रोहिणी करांडे पोपट ...

आज वडगांव सावताळ येथील माजी मुख्याध्यापक शिंदे गुलाब बाबुराव सरांना अखेरची श्रद्धांजली वाहतांना श्री सुजीत झावरे पाटील

📌 पारनेर ( प्रतिनिधी )  वडगांव सावताळ  वडगांव सावताळ येथील आदर्श मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक श्री गुलाब शिंदे सर हे वडगाव सावताळ करांचे व परीसरातील आदर्श मार्गदर्शक व आधारवड  हरपला - श्री सुजीत झावरे पाटील  आज दहा दिवसांपूर्वी गुलाबराव शिंदे सर यांचे वडगांव सावताळ येथील राहत्या घरी दु :खद निधन झाले, वडगाव सावताळ येथील जागृत देवस्थान सावताळ महाराज उत्सवात शिंदे सरांचा वर्गनी गोळा करण्यापासून ते अनेक धार्मिक कार्यक्रमात मोलाचा वाटा आहे असे आज वडगांव सावताळ येथे दशक्रिया विधी निमित्त अखेरची श्रद्धांजली वाहतांना सुजितराव झावरे पाटील म्हणाले. व शिंदे सरांनी आपले अनेक विद्यार्थी घडवुन चांगल्या पदावर कार्यरत आहे. असे ही बोलतांना सुजीत झावरे पाटील म्हणाले. शिंदे सरांचे वडगांव सावताळ गावासाठी मोठे योगदान लाभलेलं आहे. आपल आयुष्य मेहनतीने घडवुन आपले मुलांना चांगले संस्कार लावुन नातवंडे सुद्धा चांगल्या प्रकारचे बाहेर शिक्षण घेत आहे , सुजित झावरे बोलतांना म्हटले शिंदे सर यांचे नाव गुलाब शिंदे सरांनी गुलाबाच्या फुलसारखा सुगंध वडगांवकरांना दिलेला आहे.असे सुजीत पाटील श...

वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्वर मार्गे शेतपानंद रस्त्याचे भूमीपुजन सभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

📍पारनेर - ( प्रतिनिधी )  टाकळी ढोकेश्वर  वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्वर मार्गे शेतपानंद रस्त्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, आज वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्र्वर मार्गे शेत पाणंद रस्ताचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेशशेठ पठारे, अरुणराव ठाणगे, सतिष पिंपरकर, सरपंच भाऊसाहेब सैद, चेअरमन नारायण झावरे, दिलीप पाटोळे, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब शिंदे, स्वप्निल झावरे, विलास साठे सर, अमोल शिंदे सर, दत्तात्रय बर्वे,  अंकुश बर्वे, विकास झावरे, राजेश साठे, अमर भालके, निलेश भालके, अशोक चेमटे, कैलास चेमटे, माऊली चेमटे, तुषार चेमटे, शुभम चेमटे, आदित्य राऊत, योगेश साळुंके, दिपक चेमटे, विशाल चेमटे, अशोक चेमटे, काशिनाथ चेमटे, बाळासाहेब झावरे, तुकाराम चेमटे, भास्कर चेमटे, पोपट चेमटे, रामभाऊ चेमटे, अरुण चेमटे, विशाल चेमटे, निलेश भालके, सोपान राऊत, सोपान राऊत, सोमनाथ राऊत, अजिंक्य खिलारी, शंकर झावरे, गणेश झावरे, प्रसाद झावरे, महादू दाते व ग्र...

माळकूप येथील वारकरी संप्रदायातील कै. गंगाराम बबन शिंदे यांचा दशक्रिया विधी कापरी नदीवर संप्पन

🛑 पारनेर / माळकूप  माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कै. गंगाराम बबन शिंदे यांचा आज माळकूप कापरी नदीवर दशक्रिया विधी संप्पन झाला.  त्यावेळेस भाळवणी येथील ह.भ.प झांबरे महाराज यांची प्रवचन सेवा झाली. या दशक्रिया विधी निमित्त कै. गंगाराम भागाजी शिंदे यांना माननारा जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  व भाळवणी येथील त्यांचे भाचे श्री संतोष गोविंदराव चेमटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने होता. 💐💐 कै. गंगाराम बबन शिंदे गेल्याने माळकूप गावावर व शिंदे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळलेला आहे.  कै. गंगाराम बबन शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्त माळकूप गावचे सरपंच श्री संजय काळे. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक नाबगे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली अर्पण झाली. शेवटी पसायदान होऊन दशक्रिया विधी संप्पन झाला.  📍शब्दांकन  ✍️शिवशंकर शिंदे  📍पारनेर न्युज एक्सप्रेस  📱मो नं -९७६४९७२६४७

पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडुन सभासद हिताची जोपासणा - काशिनाथ दाते सर - वारसास अपघात विमा रक्कम सुपुर्द

📍पारनेर - प्रतिनिधी  टाकळी ढोकेश्वर  अतिषय छोट्या स्वरुपात असलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले दिसत आहे.  यात सर्व भागधारक , संचालक मंडळ पतसंस्थेच्या कर्मचाराऱ्यांचे मोठे व मोलाचे योगदान लाभलेले आहे. सभासद , खातेदार हिताची पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडून जोपासना होत आहे. असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री काशिनाथ दाते सर यांनी केले.  खडकवाडी ( पारनेर तालुका ) येथे पतसंस्था सभासद विमा रक्कम सुपुर्द करण्यात आली.  सभासद कुशानाथ हुलावळे यांचे अपघातात निधन झाले होते. दोन लाख रुपये सभासदास सुपुर्द केले आहे. यावेळी अमोल रोकडे, विकास रोकडे , डॉक्टर सुदाम आहेर , विठ्ठल ढोकळे , एम एन ढोकळे आदी उपस्थित होते.  अवाजवी डामडौल व अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने कारभार करणारी पारनेर ग्रामीण पतसंस्था आहे.  ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा सेवक वर्ग चांगली सेवा देत आहे.  काशिनाथ दाते सर  अध्यक्ष पारनेर ग्रामीण पतसंस्था  📍शिवशंकर शिंदे / माळकूप  ✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस  ✒️मायभूमी - पत्रकार  📱मो नं - ...