📍पारनेर ( प्रतिनिधी )
माळकूप
माळकूप इनामवस्ती येथे बिबट्याची दहशत प्रशासनानी लवकरत लवकर दखल घ्यावी - बाळासाहेब शिंदे माजी सरपंच
पारनेर तालुक्यातील माळकूप ( इनामवस्ती ) येथे मंगळवारी रात्री सुमारे ८ च्या सुमारास इनामवस्ती येथे बिबट्याची दहशत पाहण्यास मिळाली . इनामवस्ती वरील नागरीकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी माळकूपचे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी केलेली आहे .
रात्री अपरात्री शेतकरी वर्ग आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी जात असतो व सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जावे लागते . उद्या जर काही अनुचित प्रकार येथे घडला तर त्याला जबाबदार कोन अस प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे असं बाळासाहेब शिंदे म्हणाले, त्यामुळे बिबट्याची भितीचे वातावरण झालेले आहे. इनामवस्ती वरील सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांनी बाळासाहेब शिंदे यांना बिबट्यातुन भयमुक्त करावे असे आवाहन केले आहे ,
चौकट -
माळकूप इनामवस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेत विद्यार्थांना व शिक्षकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागानी लवकरात लवकर पिंजरा लावुन बिबट्याचं बंदोबस्त करण्यात यावा असे ही माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.
📍शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
📰 ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
📱9764972647
Comments
Post a Comment