✍️ पारनेर प्रतिनिधी
( जामगांव )
📝 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश उल्लेखनीय - काशिनाथ दाते सर
🛑 जामगांव सारख्या ग्रामीण भागातील स्पर्धा स्पर्धा परीक्षा उल्लेखनियेतून यश मिळवणाऱ्या विदयार्थांची संख्या अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून विवीध परीक्षेत पास होऊन शासकीय नौकऱ्या मिळवण्यात खेडेगावातील विद्यार्थांची संख्या वाढलेली आहे. असे मत जिल्हा परिषदेचे कृषी आणि बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे
जामगांव येथील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सन्मान पारनेर ग्रामीण पतसंस्था परिवाराच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
जामगांव येथील सुशांत बाबासाहेब फलके याला हैद्राबाद येथील कॉलकॉम आयटी कंपनीत ४० लाख रु. चे वार्षिक पॅकेज मिळाले. तसेच त्याचा लहान भाऊ निरंजन बाबासाहेब फलके याने एमबीबीएस ला प्रवेश मिळवला. निरंजनचे शिक्षण न्यु आर्टस , कॉमर्स व सायन्स कॉलेज येथे शिक्षण झाले असून त्याचा १२ वी मध्ये नीट परीक्षेत त्याने ७२० पैकी ६७० मार्क मिळवले. तसेच पीसीएम टॉपर मध्ये ९७.०६ व पीसीबी टॉपर मध्ये ९९.३४ मार्क मिळवून यश संपादन केलेले आहे. त्याचप्रमाणे अविनाश भागचंद खोडाळ , स्वप्निल सोबले व योगिता चौधरी यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा काशिनाथ दाते सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे संचालक श्री बाळासाहेब सोबले, श्री एकनाथ धुरपते , अमोल धुरपते ( दुय्यम - निबंधक नाशिक ) श्री रंगनाथ सोबले. श्री अनिल चौधरी , श्री बाबासाहेब फलके , श्री प्रसाद मेहेर , श्री रावसाहेब सोबले, श्री अरुण धुरपते, श्री पांडुरंग सोबले, श्री रमेश मेहेर, श्री रविंद्र शिंदे, सौ. कांचन धुरपते , शाखाअधिकारी श्री हरीभाऊ कदम साहेब , किरण सोबले , श्री सुनिल वाळुंज , व श्री दिलीप केदार व आदी मान्यवर उपस्थित होते,
चौकट -
यावेळी बोलतांना सभापती दाते सर म्हणाले शेतकरी कुटुंबातल्या जन्मलेल्या या मुलांना मिळालेले यश कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. भविष्यात त्यांना असेच यश मिळत राहो , त्याच बरोबर इतरही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थांनी यांच्यापासुन प्रेरणा घ्यावी व घवघवीत यश संपादन करून आपल्या परिसरात तालुक्यात नावलौकिक मिळवावा.
📍शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्युज एक्सप्रेस
📰 ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱976497264
Comments
Post a Comment