पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद वारसास तीन लक्ष रुपये अपघात विमा -चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त
📝 पारनेर ( पोखरी )
प्रतिनिधी
✍️ पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद वारसास ३ लक्ष रुपये अपघात विमा
✒️ चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त
📰 पारनेर २० ऑगस्ट २०२४ रोजी पोखरी ता पारनेर येथील पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे सभासद कै बबन दगडू शिंदे वय वर्ष 55 यांचे 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता पोखरी वरून टाकळी ढोकेश्वर ला बाजार निमित्ताने मुलगा शुभम बबन शिंदे व मयत कै बबन दगडू शिंदे दोघे मोटरसायकल वर येत असताना पोखरी घाट परिसरात समोरील भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप ची धडक होऊन बबन शिंदे यांना डोक्याला गंभीर मार लागून बेशुद्ध झाले होते त्यांना उपचारासाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत असल्याचे सांगितले होते
पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे बबन दगडू शिंदे हे सभासद होते झालेल्या घटनेची माहिती सभासदांच्या वारसांनी व पोखरीतील ग्रामस्थांनी संस्थापक चेअरमन काशिनाथ दाते सर यांना दिली पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सदर घटनेची संपूर्ण माहिती घेतली तसेच संस्था सभासदांचा एक लक्ष रुपयांचा अपघात व कर्जाचा दोन लाख रुपये विमा केला असल्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला सदर कै बबन दगडू शिंदे यांचे अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिकाऱ्यास संपर्क केला
आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर चौकशी करून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेत तीन लक्ष रुपये जमा झाले सभापती काशिनाथ दाते सरांनी पारनेर येथील मुख्य कार्यालयात सभासद वारस शुभम बबन शिंदे ,रोहिदास दगडू शिंदे,यांना तीन लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त केला मयत सभासद बबन शिंदे यांच्या मागे पत्नी सीताबाई बबन शिंदे मुलगा शुभम बबन शिंदे तीन मुली तीन भाऊ असा परिवार आहे
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात ,शुभम पवार , नीयाज राजे,प्रशांत जवक,इत्यादी उपस्थित होते ,
चौकट -
दाते सर आमच्या परिसराचे कुटुंबप्रमुख आहेत पोखरी परिसरातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सर सहभागी असतात पारनेर ग्रामीण पतसंस्था प्रत्येक सभासदांचा विमा उतरवित
असल्याने त्याचा फायदा माझे वडिलांचा सभासद विमा मंजूर करून आम्हाला खूप मोठी आर्थिक मदत झाली
शुभम बबन शिंदे
📍शिवशंकर शिंदे
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📝 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment