दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी समिती स्थापन सावली संघटनेचेआंदोलन : दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
📍दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी समिती स्थापन
सावली संघटनेचे आंदोलन
दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
- जिल्हा रुग्णालयाच्या लॉगीन आयडीचा वापर करून संशयिरित्या काढलेली दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आढळून आली आहेत. या प्रकरणात पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगडे यांनी सावली दिव्यांग संघटेनेच्या कार्यकर्त्यांना दिले.
मंगळवारी सावली दिव्यांग संघटेनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे यांच्या आश्वासानंतर आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर
या वेळी बाहुबली वायकर युनूस सय्यद सुभाष भावले विश्वनाथ प्रभळकर गोवर्धन वांढेकर बाबासाहेब डोळस चाँद शेख अनिल विघ्ने गौरव राठोड लक्ष्मीकांत राठोड निर्मला भालेकर शारदा गवळी अरुण गवळी रोहिणी करांडे पोपट शेळके हमीद शेख राजु मंधे आदी उपस्थित होते.
आठ दिवसांत दोषींवर कारवाई करा.
येत्या आठ दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपोषन स्थगित करत आहोत. असा इशारा सावली संघटनेच्या आंदोलकांनी या वेळी दिला.
.... लवकरच होणार गुन्हा दाखला?
जिल्हा रुग्णालयाच्या लॉगीन आयडी वरून कर्णबधीर प्रवर्गातील दिव्यांग प्रमाणपत्र अवैधरित्या प्राप्त केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांना चौकशीचे पत्र दिले होते. त्या नुसार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साहेबराव डावरे यांना गुन्हा दाखल करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयामार्फत चौकशी समिती ही नेमण्यात आली आहे. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात गुन्हा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. असे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सावली संघटनेला दिले आहे.
📍शिंदे शिवशंकर / माळकूप
✍️संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
📱मो नं -9764972647
Comments
Post a Comment