Skip to main content

सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा लढवावी : किसनराव धुमाळ यांचे झावरेंना साकडे

📍पारनेर ( प्रतिनिधी पारनेर न्यूज एक्सप्रेस ) 
सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा लढवावी. 

 किसनराव धुमाळ यांचे झावरेनां साकडे
 पारनेर तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून राजकारण करणारे नेतृत्व म्हणून सुजित झावरे पाटील यांची सर्वसामन्यात ओळख आहे.  त्यामुळे विकास कामांच्या जोरावर सुजित झावरे यांनी विधान सभेची निवडणूक लढवावी असे साकडे  किसनराव धुमाळ यांनी सुजित झावरे पाटील यांना घातले आहे.  

      सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके ज्यांची शिफारस करतील त्यालाच उमेदवारी मिळणार आहे. तर प्रतिस्पर्धी महायुतीकडून
सुजित झावरे पाटील यांनीच उभे राहावे अशी धारणा गावोगावच्या झावरे समर्थकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील  यांनी तालुक्यात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे ही निवडणूक विकासावरती लढली जावी अशीच  इच्छा किसनराव धुमाळ यांनी व्यक्त केली आहे. 

  सुजित झावरे पाटील यांनी खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी तालुक्यांमध्ये सुसंवाद ठेवला आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी असल्याचे आता मानले जात असून त्यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये पोषक निवडणुकीसाठी वातावरण आहे. पारनेर तालुक्यातील युवा वर्गामध्ये त्यांचं मुख्य आकर्षण आहे आणि ते विशेष लोकप्रिय असल्याने युवकांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे भावना धुमाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
अरुण ठाणगे ही म्हणतात झावरे पाटील ...तुम्ही लढाच
    सुजित झावरे पाटील यांचा गावोगावी दांडगा  संपर्क आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहाता 
 सुजित झावरे पाटील हे  उमेदवार म्हणून उजवे आहेत.  सर्वांना सोबत घेऊन व सर्वांना विश्वासात घेऊन विधान सभा निवडणूक करावी  असे मत माजी सभापती अरुणराव ठाणगे माजी सरपंच संतोष जाधव, भास्करराव शिंदे, अश्विन मंचरे आदी मंडळींनी केली आहे.
झावरे यांच्या रूपाने तालुक्यात सक्षम पर्याय..
तालुक्यात विकास कामांच्या माध्यमातून राजकारण करणारे नेतृत्व म्हणून सुजित झावरे पाटील यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे विकास कामांच्या जोरावर सुजित झावरे ही निवडणूक लढणार असल्याने तालुक्यात त्यांच्याकडे आता सक्षम पर्याय म्हणूनच पाहिले जात असून सुजित झावरे मैदानात येणार असल्याने समर्थक मंडळीत उत्साह तर विरोधी मंडळीत चलबिचल वाढणार आहे.

अनेक पिढ्यांचा राजकीय वारसा..

स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील पारनेर तालुक्याचे दहा वर्ष आमदार होते. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली सुजित झावरे  पाटील यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला असून खऱ्या अर्थाने सुजित झावरे यांना आजी आजोबा व वडिलांपासून खऱ्या अर्थाने राजकीय वारसा असल्याने त्यांच्याकडे एका वेगळ्या अपेक्षणे आता तालुक्यात पाहिले जात आहे.

📍 शिवशंकर शिंदे / माळकूप 
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस 
✒️ पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक 
📱9764972647

Comments

Popular posts from this blog

माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

📍माळकूप / पारनेर  माळकूप येथील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत माळकूपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळेस माळकूप येथील सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन माळकूप मधील १० वी व १२ वी यशस्वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळेस सरपंच श्री संजय काळे बोलतांना म्हणाले कि या मध्ये या सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमागे त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे व त्यांच्या पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. या मुळे गावाला अभिमान वाटतो. व गावचे नाव मोठे होते. सरपंच यांनी पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या.  त्यावेळेस उपस्थित माळकूप गावचे उपरसपंच श्री राहुलशेठ घंगाळे, माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे, श्री सर्जेराव घंगाळे , माळकूप सेवा सोसायटी चेअरमन श्री सुदाम शिंदे , माजी चेअरमन कृष्णाजी कोंडाजी शिंदे ,श्री सुधीर ठाणगे , श्री अतुल पवार ग्रामपंचायत सदस्य , श्री मंजाबाप्पु शिंदे श्री शिवाजी गंगाराम काळे व आदि मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सौ. रेष्मा ...

माळकूप येथील वारकरी संप्रदायातील कै. गंगाराम बबन शिंदे यांचा दशक्रिया विधी कापरी नदीवर संप्पन

🛑 पारनेर / माळकूप  माळकूप येथील गंगाराम बबन शिंदे यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. कै. गंगाराम बबन शिंदे यांचा आज माळकूप कापरी नदीवर दशक्रिया विधी संप्पन झाला.  त्यावेळेस भाळवणी येथील ह.भ.प झांबरे महाराज यांची प्रवचन सेवा झाली. या दशक्रिया विधी निमित्त कै. गंगाराम भागाजी शिंदे यांना माननारा जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  व भाळवणी येथील त्यांचे भाचे श्री संतोष गोविंदराव चेमटे यांचे नातेवाईक व मित्र परिवार सुद्धा मोठ्या संख्येने होता. 💐💐 कै. गंगाराम बबन शिंदे गेल्याने माळकूप गावावर व शिंदे परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळलेला आहे.  कै. गंगाराम बबन शिंदे यांच्या दशक्रिया विधी निमित्त माळकूप गावचे सरपंच श्री संजय काळे. माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व सेवा सोसायटी चेअरमन कुंडलीक नाबगे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या श्रद्धांजली अर्पण झाली. शेवटी पसायदान होऊन दशक्रिया विधी संप्पन झाला.  📍शब्दांकन  ✍️शिवशंकर शिंदे  📍पारनेर न्युज एक्सप्रेस  📱मो नं -९७६४९७२६४७

भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉईंटचे सोमवारी दिमाखदार उद्घाटन संप्पन

📍भाळवणी ( प्रतिनिधी )  भाळवणी येथील सनराज नाष्टा पॉइंटचे सोमवारी उदघाटन संप्पन  भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोष गोविंदराव चेमटे व श्री राजेंद्र गोविंदराव चेमटे यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई गोविंदराव चेमटे यांच्या हस्ते सनराज नाष्टा पॉइंटचे उद्घाटन झाले.  त्यावेळेस उपस्थित भाळवणी गावचे आदर्श सरपंच सौ. लिलाबाई रोहोकले माळकूप गावचे माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.  चेमटे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक ,हितचिंतक , मित्रपरिवार, भाळवणी येथील मित्र परिवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.  श्री संतोष चेमटे व राजेंद्र चेमटे यांनी नव्याने सुरु केलेल्या सनराज नाष्टा पॉईंटमध्ये ग्राहकांना आकर्षित केले जाईल असे मेन्यु ठेवलेले आहे.  ग्राहकांनी एकदा आस्वाद घेण्यासाठी सनराज नाष्टा पॉईंटमध्ये भेट द्यावी असे आव्हान चेमटे परिवारानी केले आहे.  📍 शब्दांकन  ✍️ श्री शिवशंकर शिंदे / माळकूप  पारनेर न्यूज व मायभूमी पत्रकार  📱9764972647