📌 पारनेर प्रतिनीधी
पारनेर न्यूज एक्सप्रेस
कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहूलने मिळवले यश : सभापती काशिनाथ दाते सर
जामगाव ता. पारनेर येथील राहुल गोवर्धन बांगर यांची सन २०२२ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सन्मान केला यावेळी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन आप्पा भुजबळ, बबलू शेठ रोहकले, पारनेर ग्रामीण पतसंस्था जेष्ठ संचालक बाळासाहेब सोबले, मा. चेअरमन एकनाथ धुरपते, ह भ प योगेश महारा शिंदे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राहुलने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. राहुलचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. तेरा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मिळवलेले हे यश निश्चितपणे प्रेरणादायी आहे. त्याच्या या यशात आई श्रीमती सविता बांगर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर पप्पू शेठ बांगर व त्यांचा संपूर्ण बांगर परिवार नातेवाईक ग्रामस्थ यांचेही योगदान नाकारता येणार नाही. जामगाव येथील शेतकरी कुटुंबातील राहुल आज फार मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला ही गावच्या नव्हे तर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीही या गावातून धुरपते आणि सोबले कुटुंबातील उच्च पदावर नियुक्त झालेल्या युवकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. राहुलच्या यशाने जामगाव च्या गौरवशाली वैभवात भर घातली, यापुढे आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम त्याने करावे, यापुढे त्याला असेच यश मिळत राहो, आई चुलते आपला परिवार यांचे नाव उज्वल करावे अशी सदिच्छा आणि शुभेच्छा यावेळी सभापती दाते यांनी दिली. बाळासाहेब माळी, सुभाष दुधाडे, किसन भुजबळ, बबलू रोहकले, ह भ प योगेश शिंदे यांनीही आपले मनोगतात राहुल यांस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती दाते सरांच्या हस्ते राहुलचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच त्याची आई श्रीमती सविता गोवर्धन बांगर यांच्यासह संपूर्ण बांगर परिवाराचा सन्मान करण्यात आला. गावातून सवाद्य मिरवणूक काढून बांगरवाडी येथे हा सन्मान सोहळा संपूर्ण बांगर परिवाराने "याची देही याचा डोळा अनुभवला" परिसरातील विविध गावच्या प्रतिनिधींनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण बांगर परिवार तसेच यावेळी शंकर महांडुळे, सेवा सोसायटीचे चेअरमन नवनाथ बांगर, व्हा चेअरमन विष्णुपंत नाईक, सोसायटी सचिव विनायक रोहकले, सर्व आजी-माजी पदाधिकारी, मा. सरपंच राजेंद्र नाईक, ग्रामपंचायत जामगाव चे सर्व माझी आजी-माजी सदस्य, बांगरवाडी, जामगाव ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबजी बांगर यांनी केले, सूत्रसंचालन नंदू शिंदे यांनी केले तर युवा नेते पप्पू बांगर यांनी सर्वांचे आभार मानले.
🔸माझे पीएसआय होण्याचे स्वप्न होते, बऱ्याच वेळा अपयश आले तरी पण खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवले, माझ्या आईची मला मोलाची साथ होती, माझे चुलते विजय बांगर, आजोबा नाथु बांगर, चुलत भाऊ पप्पू बांगर व इतर मित्रांनी मला आर्थिक मदत केली. पुण्यातील रयत प्रबोधनीचे उमेश कुदने सर यांनी मार्गदर्शन केले. मला यश मिळाले या सर्वांमुळे :
राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक
शिवशंकर शिंदे
📌 संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
पत्रकार - मायभूमी व दिव्य जनलोक
मो नं - 9764972647
Comments
Post a Comment