✍️ पारनेर ( प्रतिनीधी ) पारनेर न्यूज एक्सप्रेस 🛑 माळकूप येथे तुळजाभवानी पालखीचे संध्याकाळी दर्शनासाठी आगमन ✍️ पारनेर तालुक्यातील माळकूप येथे शुक्रवारी संध्याकाळी आठच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथून जात असताना तुळजाभवानी पालखीचे माळकूप ग्रामस्थांना दर्शनाचा लाभ मिळाला अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री अभय भिसे सालाबाद प्रमाणे दरवर्षी माळकूप ग्रामस्थांना दर्शनासाठी दोन तास पालखी यावी असे तुळजाभवानी माता पालखीचे कमिटी सदस्य व भक्त यांना विनंती केली असता त्यांचा शाल श्रीफल देऊन सन्मानित करण्यात आले. तुळजाभवानी पालखीचे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री अभय भिसे यांच्या निवासस्थानी तुळजा भवानी पालखीचे आगमन झालेले होते ,त्यावेळेस माळकूप गावचे विद्यमान सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन गावातील महादेव मंदिर येथे ढोल ताशा पथकाच्या आवाजात पालखीचे मोठी मिरवणूक ग्रामस्थांनी काढली त्यावेळेस महिला संख्या जास्त प्रमाणात दर्शनासाठी महादेव मंदिर येथे आलेल्या होत्या ,नंतर ढवळपुरी फाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अभय भिसे यांच्या नि...