काळकूप विविध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री विनायक सालके व व्हा. चेअरमनपदी श्री बाळासाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली
📍पारनेर ( प्रतिनिधी )
काळकूप
पारनेर न्यूज एक्सप्रेस
🛑 काळकूप सोसायटीच्या चेअरमनपदी श्री विनायक सालके तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली
✍️ काळकूप विविध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री विनायक सालके तर व्हा. चेअरमनपदी श्री बाळासाहेब कदम यांची बिनविरोध निवड झाली विद्यमान चेअरमन श्री शिवाजी खरमाळे व विद्यमान व्हा. चेअरमन श्री दत्तात्रय कदम यांनी राजीनामा दिल्याने सदर पदे रिक्त झाली होती .
अडीच वर्षांपूर्वी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती त्यावेळी ठरल्याप्रमाणे हा बदल करण्यात आला यावेळी श्री शिवाजी खरमाळे श्री दत्तात्रय कदम श्री विनायक सालके श्री धोंडीभाऊ गायकवाड श्री बाळासाहेब कदम श्री शिवाजी कदम श्री भरत शिंदे श्री प्रवीण कदम श्री शिवाजी अडसूळ नंदाताई कदम व जनाबाई अडसूळ आदी संचालक उपस्थित होते
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दूध संघाचे मा. चेअरमन श्री वसंतराव सालके सरपंच ताराबाई कदम मा. चेअरमन गंगाराम खरमाळे यांनी अभिनंदन केले तसेच श्री ज्ञानदेव खरमाळे श्री नामदेव कदम श्री भाऊसाहेब कदम श्री भागाशेठ कदम तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब खरमाळे श्री रावसाहेब कदम श्री नंदूशेठ कदम श्री संदीप सालके श्री रावसाहेब खरमाळे श्री रवी कदम श्री मनोज मते श्री अनिल कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री चाबुकस्वार यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून सचिव श्री सुरेश अडसूळ यांनी काम पाहिले
🔸चौकट
सर्व संचालक व सभासद यांना बरोबर घेऊन यापुढे काम केले जाईल तसेच सेवा सोसायटीच्या माध्यमातून विविध कर्ज योजनांचा लाभ सर्वांना मिळेल यासाठी प्रयत्न करू तसेच १००% टक्के वसुलीसाठी प्रयत्न करू
नवनियुक्त चेअरमन - विनायक सालके
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्स्प्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰पत्रकार - दिव्य जनलोक - मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment