⭕ पारनेर ( प्रतिनिधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
📍काळकूप येथील कदम वस्ती येथे नवमीनिमित्त आरती व महाप्रसादाचे आयोजन
🛑 काळकूप मधील कदमवस्ती येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात दर महिन्याच्या नवमीला प्रवचन ,भजन व महाप्रसादाचे आयोजन काळकूप ग्रामस्थांच्या वतीने केले जाते या महिन्याच्या नवमीला गुरुवार दिनांक १२.९. २०२४ रोजी सायंकाळी काळकूप येथील श्री अंबादास ( भाऊसाहेब ) दगडू कदम यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे तसेच ह भ प यशवंत महाराज थोरात यांचे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रवचन आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे साधारण पाच वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना काळकूप ग्रामस्थांनीपुढाकार घेऊन लोकसहभागातून कदम वस्ती परिसरात केली आहे.त्यासाठी आवश्यक जागा श्री भाऊसाहेब विठोबा कदम यांनी दिली आहे. या ठिकाणी दररोज नित्यनियमाने पूजा अर्चा केली जाते या मंदिराच्या स्थापनेमुळे परिसरात भक्तीमय वातावरण आहे
🔶 चौकट -
कदम वस्ती परिसरात पाच वर्षांपूर्वी राम मंदिराची स्थापना लोकसहभागातून झाली नवमीला कदम वस्तीवरील अबालवृद्धांपासून सर्वजण अत्यंत उत्साहपूर्वक योगदान देत असतात पूर्वी या ठिकाणी एकही वस्ती नव्हती उजाड परिसर होता परंतु आता प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती स्थापनेपासून आज हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे सर्वांनी मिळून या ठिकाणी रामभक्तीचा मळा फुलविला आहे
सामाजिक कार्यकर्ते - श्री हरिभाऊ कदम
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
✒️ पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment