✍️ पारनेर ( प्रतिनीधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
🛑 माळकूप येथे तुळजाभवानी पालखीचे संध्याकाळी दर्शनासाठी आगमन
✍️ पारनेर तालुक्यातील माळकूप येथे शुक्रवारी संध्याकाळी आठच्या सुमारास टाकळी ढोकेश्वर येथून जात असताना तुळजाभवानी पालखीचे माळकूप ग्रामस्थांना दर्शनाचा लाभ मिळाला अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री अभय भिसे सालाबाद प्रमाणे दरवर्षी माळकूप ग्रामस्थांना दर्शनासाठी दोन तास पालखी यावी असे तुळजाभवानी माता पालखीचे कमिटी सदस्य व भक्त यांना विनंती केली असता त्यांचा शाल श्रीफल देऊन सन्मानित करण्यात आले. तुळजाभवानी पालखीचे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री अभय भिसे यांच्या निवासस्थानी तुळजा भवानी पालखीचे आगमन झालेले होते ,त्यावेळेस माळकूप गावचे विद्यमान सरपंच श्री संजय काळे यांनी पुढाकार घेऊन गावातील महादेव मंदिर येथे ढोल ताशा पथकाच्या आवाजात पालखीचे मोठी मिरवणूक ग्रामस्थांनी काढली त्यावेळेस महिला संख्या जास्त प्रमाणात दर्शनासाठी महादेव मंदिर येथे आलेल्या होत्या ,नंतर ढवळपुरी फाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अभय भिसे यांच्या निवासस्थानी तुळजाभवानी पालखीचे ढोलताशा पथकांच्या आवाजात आगमन झाले व आरती नैवेद्य दाखवून ढोल ताशांच्या पथकात तुळजाभवानी पालखीचे आगमन जामगाव कडे झाले माळकूप येथील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ देवस्थान युवा वर्ग हा ही मोठ्या संख्येने उपस्थित होता ,
🔶 उपस्थित मान्यवर -
📍 माळकूप सरपंच श्री संजय काळे, (माजी सरपंच ) बाळासाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अभय भिसे, कुंडलिक नाबगे ( गुरुजी ) , संभाजी नाबगे, भास्कर काळे, पोपट खांडके, मंजाबापू शिंदे, कृष्णाजी शिंदे, आदिनाथ नेव्हे, गोटू शिंदे, सुधीर ठाणगे, अशोक शिंदे (प्रगतशील शेतकरी ), किरण शिंदे , संदीप शंकर काळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
🔶 चौकट -
✒️ आपलं माळकूप गांव लहान आहे आपल्या गावाला अभिमान आहे की तुळजाभवानी पालखीचे दोन तास दर्शनासाठी महिलांना व गावातील सर्वच नागरिकांना दर्शनाचा लाभ मिळाला यावेळेस दोन तास मिळाले पुढच्या वेळेस चार तास आपल्या गावासाठी मिळावे अशी मी कमिटीला विनंती करील असे बोलताना अभय भिसे म्हणाले
🎤 अभय भिसे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अहिल्यानगर
🌹शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
💁♂️ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment