🛑 पारनेर ( प्रतिनीधी )
पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ पारनेर ग्रामीण पतसंस्थेतर्फे सभासदांना ११ टक्के लाभांश
🛑 पारनेर : पारनेर तालुक्यातील पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले
पतसंस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी संस्थापक चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली मणकर्णिका लॉन्स मंगल कार्यालय पारनेर येथे झाली यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर संचालक बाळासाहेब सोबले आर एस कापसे सर लक्ष्मण डेरे मयूर गांधी अर्जुन गाजरे राजेंद्र औटी कृष्णा उमाप सुभाष राठोड सुनंदा रामदास दाते दिलीप दाते सुनील गाडगे व सौ आशा शांताराम तराळ तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थित होते संस्थेला सण २०२३ - २४ या आर्थिक वर्षात २ कोटी ५६ लाख ३५ हजार ३७८ निव्वळ नफा व ऑडिट वर्ग अ मिळाल्याचे चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी सांगितले संस्थेकडे मार्च २०२४ अखेर २११ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत
संस्थेची बँक गुंतवणूक ६३ कोटी असून स्थावर मालमत्ता ३ कोटी ८० लाख असून सभासदांना १७१ कोटी रुपये कर्ज वितरण केलेले आहे अशी माहिती व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे यांनी दिली सूत्रसंचालन आर एस कापसे यांनी केले आभार व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे यांनी मानले देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक तसेच सैनिकांच्या वीर पत्नी ठेवींवर अर्धा टक्का ज्यादा व्याज देण्याचे जाहीर करण्यात आले ✍️
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य -जनलोक मायभूमी
📱9764972647
Comments
Post a Comment