🛑 पारनेर - ( प्रतिनिधी )
भाळवणी - पारनेर न्यूज एक्सप्रेस
🔶 शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त घट सजावट मध्ये शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
✍️ पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरीटेबल ट्रस्ट भाळवणी स्व.नानापाटील रोहोकले युवा ग्रामविकास प्रतिष्ठान व दोस्ती युवा ग्रुप आयोजित नवरात्री उत्सवानिमित्त घट सजावट मध्ये भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची बहीण शारदा राजेंद्र रोहोकले यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार श्री निलेशजी लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके यांच्या हस्ते पिठाची गिरणी बक्षीस म्हणून देण्यात आली .
भाळवणी येथील युवा उद्योजक श्री संतोषशेठ गोविंदराव चेमटे यांची नवरात्री उत्सवानिमित्त नऊ दिवस मंडळाला अनेक प्रकारचे सहकार्य नियोजन असते व भरघोस बक्षिसांची मदत होते यापुढेही त्यांच्या मदतीचा हात मंडळाला राहणार आहे असेही संतोषशेठ चेमटे यांनी सांगितले .
त्या वेळेस भाळवणी येथील श्री बबलूशेठ रोहोकले, श्री संदीपशेठ कपाळे, श्री राजेंद्रशेठ चेमटे , सौ शोभा संतोष चेमटे ,सौ. आशा राजेंद्र चेमटे, आकाश चौरे ,सुधाकर रोहोकले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भाळवणी आबुज सर ,संतोष रोहोकले सर ,शिवाजी आमले ,व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
🔶 चौकट -
शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त भाळवणी येथे अनेक उपक्रम राबविल्याबद्दल परिसरात व तालुक्यात जिल्ह्यात भाळवणी गावचे नाव लौकिक झाले श्री बबलूशेठ रोहोकले व संदीपशेठ कपाळे यांचे मनापासून आभार
💁♂️ सौ. राणीताई लंके
जिल्हा परिषद सदस्या
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य जनलोक मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment