📌 पारनेर ( प्रतिनिधी )
गोरेगांव
🛑 श्री गोरेश्वर विद्यालयात, आकाश कंदील बनवा कार्यशाळा :-
✍️ अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मॉडेल व्हिलेज गोरेगाव. या विद्यालयात सोमवार दि. 14/10/2024 रोजी मुलांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी, कलाशिक्षक श्री मंगेश काळे सर, यांनी "पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवा." या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यालयातील, अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, अशा उपक्रमाचे विद्यालयात आयोजन केले जावे. असे प्राचार्य श्री. सुरेश जावळे यांनी सांगितले. आकाश कंदील बनविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक श्री मंगेश काळे यांचे प्राचार्यांनी कौतुक केले.
"कलाशिक्षक श्री. काळे सरांनी कागदापासून आकाश कंदील कसे बनवायचे. याचे सखोल मार्गदर्शन केले. हे आकाश कंदील बनविताना, आम्हाला खूप आनंद मिळाला."
🔶 विद्यार्थिनी
(कु. श्रुती घंगाळे)
" दिवाळी हा देशातील अतिशय मोठा सण असून, या दिवशी घरावर आकाश कंदील लावले जातात. दिवसेंदिवस आकाश कंदीलांची मागणी व किंमत वाढत चालली आहे. कलाशिक्षक श्री. मंगेश काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खूप छान आकाश कंदील बनविले आहे. हे "आकाश कंदील" मुलांनी आपल्या घरावर लावावे. निश्चितच मुलांना व आई-वडिलांना अतिशय आनंद वाटेल.
🔶 प्राचार्य
(श्री. सुरेश जावळे)
याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. कैलास खिलारी, श्री. बाळासाहेब खिलारी, श्री. दत्तात्रय नरसाळे, श्रीम. कमल औटी, सौ. संध्या खिलारी, सौ. सुजाता नरसाळे, सौ. ज्योती वाघ व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ संपादक - पारनेर न्यूज एक्सप्रेस
⭕ ताज्या घडामोडी सत्य घटनांचे प्रतिबिंब
📰 पत्रकार - दिव्य - जनलोक मायभूमी
📱९७६४९७२६४७
Comments
Post a Comment