Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

स्वामी समर्थ देवस्थान माळकूप व गावासाठी विकासकामाच्या निधीसाठी भरीव निधी देणार - आमदार काशिनाथ दाते सर

🛑 मी स्वामी सेवेकरी म्हणून स्वामी समर्थ देवस्थानच्या विकास कामासाठी कटिबद्ध - आमदार काशिनाथ दाते सर ✍️ संपादक पारनेर न्यूज शिवशंकर शिंदे  🟡 माळकूप येथील स्वामी समर्थ देवस्थान येथे विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पारनेर नगर मतदार संघाचे नवनियुक्त आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली. ⭕ पारनेर तालुक्यातील माळकुप येथे हजारो लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकुप येथे आज दत्तजयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.माळकूप चे सरपंच श्री संजय काळे यांनी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी किरण पंडित, युवा नेते  डॉक्टर प्रदीप दाते ,बाळासाहेब शिंदे,संदीप ठुबे, पत्रकार शिवशंकर शिंदे, युवा नेते किरण शिंदे ,डॉक्टर संजय नाबगे ,पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हरिभाऊ कदम, संतोष रोहोकले सर ,चेतन कुंभकर्ण,उद्योजक सुमित रोहोकले, योगेश कुंभकर्ण ,दीपक शिंदे, योगेश शिंदे, निलेश शिंदे, सकाराम नाबगे, राजुशेठ नाबगे, गंगाधर नाबगे आदी मान्यवर तसेच  स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्ध किरण गुंजाळ यांची माहिती

सर्व सेवा आणि सुविधायुक्त रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी उपलब्द किरण गुंजाळ यांची माहिती  📍पारनेर न्यूज  ✍️ शिवशंकर शिंदे - संपादक  🔶 पारनेर तालुका येथे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथपर्यंत शतायु हॉस्पिटल व किरण बाबासाहेब गुंजाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने के.जी.ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केलेली आहे,  या ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्हेंटिलेटर मॉनिटर सक्षम मशीन डीफीबलेटर एक अनुभवी डॉक्टर तसेच एक अनुभवी नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे सुविधा केलेली आहे किरण गुंजाळ हे शिवसेना युवा सेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट म्हणून कार्यरत आहेत, त्यांसोबत माळकुप येथील रवींद्र खोडदे हे यांच्या सोबतीला असणार आहेत अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे हे ॲम्बुलन्स ढवळपुरी फाटा येथे दररोज उपलब्ध आहे,  किरण गुंजाळ यांनी संपर्कासाठी हा नंबर दिलेला आहे, 📱 8484848339  या वरील नंबर वरती नगर कल्याण हायवे अहिल्यानगर ते कर्जुले हर्या इथे कुठे ही अपघात झाल्यास या वरील नंबर वरती तात्काळ संपर्क करण्यात यावा अशी माहिती किरण गुंजाळ यांनी दिलेली आहे .

ओम नरसाळेची डॉक्टर सि.व्ही. रामन बाल वैज्ञानिक परीक्षेतून इस्रोसाठी निवड

🔶 ओम नरसाळेची डॉ .सी.व्ही. रामन बाल वैज्ञानिक परीक्षेतून इस्त्रोसाठी निवड ✍️ शिवशंकर शिंदे पत्रकार  पारनेर न्यूज           🟡 डॉ .सी.व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षेअंतर्गत दरवर्षी राज्यातून गुणवत्ताधारक व क्रियाशील विदयार्थ्यांची इस्त्रोसाठी निवड केली जाते . यावर्षी रेसिडेन्सिल हायस्कूल ,आहिल्यानगरचा विदयार्थी ओम सुनिल नरसाळे याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले .       त्यामुळे त्याला दि .५ डिसेंबर रोजी श्रीहरीकोटा (इस्त्रो ) येथे झालेल्या पी .एस.एल. व्ही .५९ या उपग्रहाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहण्यासाठी विमानाने पुणे ते चेन्नई असा प्रवास करण्याचाही योग आला . पी .एस.एल. व्ही .५९च्या सहाय्याने सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे .      या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी ओमला मिळाली त्याबद्दल त्याचे मित्र , नातेवाईक , शिक्षक व सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .      या ४ दिवसांच्या वैज्ञानिक भेटीदरम्यान हे विदयार्थी श्रीहरीकोटा येथील इस्त्रो संस्थ...

आमदार काशिनाथ दाते परिवार कायम दिव्यांगाच्या सोबत राहणार - डॉक्टर प्रदिप दाते

आमदार काशिनाथ दाते परिवार कायम दिव्यांगांच्या सोबत राहणार - डॉक्टर प्रदीप दाते पत्रकार -शिवशंकर शिंदे पारनेर न्यूज  १६ डिसेंबर १९९२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने जगभरातील सरकारांना दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून पाळण्याचे आव्हान केले जगभरातील दिव्यांग लोकांच्या क्षमतांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे . आज पारनेर येथे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या निवासस्थानी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस माळकूप येथील श्री अरुण गवळी ,शारदा गवळी, निर्मला भालेकर, पत्रकार शिवशंकर शिंदे, विष्णु शिंदे ,भाळवणी येथील अरुण रोहोकले दीपक रोहोकले ,उपस्थित होते. आमदार काशिनाथ दाते सर यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व डॉक्टर प्रदीप दाते यांनी सर्व दिव्यांग बांधवांचा सन्मान सोहळा केला व बोलताना सांगितले आमचे दाते परिवार कायम आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी कटिबद्धी राहणार आहे आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्याचे काम आमदार साहेब करणार आहे अशी माहिती डॉक्ट...