आमदार काशिनाथ दाते परिवार कायम दिव्यांगांच्या सोबत राहणार - डॉक्टर प्रदीप दाते
पत्रकार -शिवशंकर शिंदे
पारनेर न्यूज
१६ डिसेंबर १९९२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने जगभरातील सरकारांना दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून पाळण्याचे आव्हान केले जगभरातील दिव्यांग लोकांच्या क्षमतांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे .
आज पारनेर येथे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या निवासस्थानी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस माळकूप येथील श्री अरुण गवळी ,शारदा गवळी, निर्मला भालेकर, पत्रकार शिवशंकर शिंदे, विष्णु शिंदे ,भाळवणी येथील अरुण रोहोकले दीपक रोहोकले ,उपस्थित होते. आमदार काशिनाथ दाते सर यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व डॉक्टर प्रदीप दाते यांनी सर्व दिव्यांग बांधवांचा सन्मान सोहळा केला व बोलताना सांगितले आमचे दाते परिवार कायम आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी कटिबद्धी राहणार आहे आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्याचे काम आमदार साहेब करणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रदीप दाते यांनी दिली व जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना डॉक्टर प्रदीप दाते यांनी व त्यांच्या सर्व परिवारांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळेस मंगेशशेठ दाते व त्यांच्या मातोश्री यांनी सुद्धा सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या .
जागतिक अपंग दिन - संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगांसाठी अर्पण करण्यात आले होते जगभरातील संपूर्ण देशभरात या दशकांमध्ये दिव्यांगांच्या उद्धारासाठी योजना राबविण्यात भाग पडले होते या दशकाच्या शेवटी ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा करण्याबाबत या दिवसाची निवड करण्यात आली होती . २०१६ दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग असा शब्द बदल करण्यात आला आहे. तेव्हापासून ३ डिसेंबर दिव्यांग दिन म्हणून ओळखला जातो
डॉक्टर प्रदिप दाते
✍️✍️✍️✍️
Comments
Post a Comment