स्वामी समर्थ देवस्थान माळकूप व गावासाठी विकासकामाच्या निधीसाठी भरीव निधी देणार - आमदार काशिनाथ दाते सर
🛑 मी स्वामी सेवेकरी म्हणून स्वामी समर्थ देवस्थानच्या विकास कामासाठी कटिबद्ध - आमदार काशिनाथ दाते सर
✍️ संपादक पारनेर न्यूज
शिवशंकर शिंदे
🟡 माळकूप येथील स्वामी समर्थ देवस्थान येथे विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पारनेर नगर मतदार संघाचे नवनियुक्त आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली.
⭕ पारनेर तालुक्यातील माळकुप येथे हजारो लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकुप येथे आज दत्तजयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.माळकूप चे सरपंच श्री संजय काळे यांनी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी किरण पंडित, युवा नेते डॉक्टर प्रदीप दाते ,बाळासाहेब शिंदे,संदीप ठुबे, पत्रकार शिवशंकर शिंदे, युवा नेते किरण शिंदे ,डॉक्टर संजय नाबगे ,पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हरिभाऊ कदम, संतोष रोहोकले सर ,चेतन कुंभकर्ण,उद्योजक सुमित रोहोकले, योगेश कुंभकर्ण ,दीपक शिंदे, योगेश शिंदे, निलेश शिंदे, सकाराम नाबगे, राजुशेठ नाबगे, गंगाधर नाबगे आदी मान्यवर तसेच स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काशिनाथ दाते सर बोलताना म्हणाले मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे.यापूर्वी मी जिल्हा परिषदेत बांधकाम समितीचा सभापती असताना सभामंडप दिला आहे.स्वामी कृपेने आज मी आमदार असून येथील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तर माळकूप गावासाठी भरीव निधी देणार असल्याचे सांगितले. राज्यात आणि केंद्रात आपलेच सरकार आहे.त्यामुळे तुम्हांला जे काही पाहिजे ते देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन.
यावेळी दत्तजयंती निमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हभप अशोक महाराज कोंगे यांचे कीर्तन झाले.त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद म्हणून आमटी भाकरीचे आयोजन करण्यात आले होते.दर गुरुवारी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
✍️✍️✍️✍️✍️✍️
Comments
Post a Comment