🔶 ओम नरसाळेची डॉ .सी.व्ही. रामन बाल वैज्ञानिक परीक्षेतून इस्त्रोसाठी निवड
✍️ शिवशंकर शिंदे पत्रकार
पारनेर न्यूज
🟡 डॉ .सी.व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षेअंतर्गत दरवर्षी राज्यातून गुणवत्ताधारक व क्रियाशील विदयार्थ्यांची इस्त्रोसाठी निवड केली जाते . यावर्षी रेसिडेन्सिल हायस्कूल ,आहिल्यानगरचा विदयार्थी ओम सुनिल नरसाळे याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले .
त्यामुळे त्याला दि .५ डिसेंबर रोजी श्रीहरीकोटा (इस्त्रो ) येथे झालेल्या पी .एस.एल. व्ही .५९ या उपग्रहाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहण्यासाठी विमानाने पुणे ते चेन्नई असा प्रवास करण्याचाही योग आला . पी .एस.एल. व्ही .५९च्या सहाय्याने सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे .
या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी ओमला मिळाली त्याबद्दल त्याचे मित्र , नातेवाईक , शिक्षक व सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .
या ४ दिवसांच्या वैज्ञानिक भेटीदरम्यान हे विदयार्थी श्रीहरीकोटा येथील इस्त्रो संस्थेला भेट , विज्ञान प्रयोगशाळा , तारांगण , प्राणीसंग्रहालय , पक्षी अभयारण्य तसेच क्रोकोडाईल म्युझियम अशा विविध ठिकाणी भेटी देणार आहेत .
ओम हा इ .५ वीचा स्कॉलरशिपचा शिष्यवृत्ती धारक विदयार्थी आहे . तसेच तो मंथन प्रज्ञाशोध , नॅशनल स्कॉलर सर्च , लक्षवेध प्रज्ञाशोध, डॉ . हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षा ,सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा या सारख्या स्पर्धा परीक्षांमधे राज्य गुणवत्ता यादीत आलेला विदयार्थी आहे .
त्याच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे . या यशात त्याला त्याच्या पालकांबरोबरच रेसिडेन्सिअल शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
त्याच्या या निवडीबद्दल व यशाबद्दल ओमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
✍️✍️✍️✍️✍️
Comments
Post a Comment