🔸पारनेर न्यूज संपादक शिवशंकर शिंदे 🛑 संघर्ष केल्यावर हमखास यश मिळते असे प्रतिपादन पारनेर नगर विधानसभेचे सदस्य आमदार काशिनाथ दाते यांनी केले. 🛑 भाळवणी येथे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय 52 व्या गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सांगता समारंभाचे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री ज्ञानदेव पांडुळे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद तोरणे, सहाय्यक इन्स्पेक्टर रयत शिक्षण संस्था अहिल्यानगर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा राणे, स्कूल कमिटीचे चेअरमन मुरलीधर रोहोकले दादा, प्राचार्य नाईकवाडी बी एस. विज्ञान गणित संघटनेचे अध्यक्ष श्री सोपान गवते सर, सचिव श्री दीपक फापाळे सर , संघटनेचे सर्व पदाधिकारी, उद्योगपती श्री गोरखशेठ रोहोकले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री संभाजी रोहोकले सर, सरपंच सौ लिलाताई रोहोकले, भाळवणी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य श्री संदीप शेठ रोहोकले, श्री बबलू शेठ रोहोक...