🔸पारनेर न्यूज संपादक
शिवशंकर शिंदे
🛑 संघर्ष केल्यावर हमखास यश मिळते असे प्रतिपादन पारनेर नगर विधानसभेचे सदस्य आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
🛑 भाळवणी येथे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय 52 व्या गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सांगता समारंभाचे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री ज्ञानदेव पांडुळे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद तोरणे, सहाय्यक इन्स्पेक्टर रयत शिक्षण संस्था अहिल्यानगर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा राणे, स्कूल कमिटीचे चेअरमन मुरलीधर रोहोकले दादा, प्राचार्य नाईकवाडी बी एस. विज्ञान गणित संघटनेचे अध्यक्ष श्री सोपान गवते सर, सचिव श्री दीपक फापाळे सर , संघटनेचे सर्व पदाधिकारी, उद्योगपती श्री गोरखशेठ रोहोकले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री संभाजी रोहोकले सर, सरपंच सौ लिलाताई रोहोकले, भाळवणी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य श्री संदीप शेठ रोहोकले, श्री बबलू शेठ रोहोकले, श्री रावसाहेब रोहोकले, श्री संदीप ठुबे,विस्तार अधिकारी श्री कांतीलाल ढवळे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना
🛑 आ.दाते यांनी शालेय स्तरावर अशा आयोजित केलेल्या प्रदर्शनांमधून प्रेरणा घेऊन डॉक्टर कलामांचा आदर्श घेऊन कल्पकता व मेहनतीच्या जोरावर शास्त्रज्ञ विज्ञानामुळे जग जवळ आले आहे जागतिक पातळीवर ज्ञान व कौशल्याचे महत्त्व आहे. आजच्या पिढीतील बालकांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे, शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थी घडवला पाहिजे. शासनाने मुलींचे शिक्षण मोफत करून शिक्षणाला चालना दिले आहे. शिक्षक विद्यार्थी घडवणारा असून तो घडवण्यासाठी हवे ते कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. मी स्वतः देखील 40 वर्ष संघर्ष करून विधानसभेत पोहोचलो पहिल्या पाच दिवसाच्या अधिवेशनात सलग चार दिवस मतदार संघाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली, पाच वर्षात सर्व क्षेत्रात आगळे वेगळे काम करणार आहे.
🔸 यावेळ आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री ज्ञानदेव पांडुळे यांनी यांनी भारतातील तरुण पिढीने विज्ञानातील प्रगती बरोबर वाढलेले प्रदूषण मी करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे , पर्यावरण समतोल राखावाअशी अपेक्षा व्यक्त केली.
🔸 यावेळी तालुक्यामधून प्रत्येक गटामध्ये प्रथम आलेल्या तीन अशा एकूण 35 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह असे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी तालुक्यामध्ये प्रत्येक गटात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक श्री गोरखशेठ रोहोकले यांच्याकडून पालकांसह विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विज्ञान सहलीसाठी घेऊन जाण्याचे जाहीर करण्यात आले.
🔸 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सोपान गवते सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष रोहोकले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. पर्यवेक्षक सदानंद सोनवळे, विज्ञान विभाग प्रमुख सौ तैसीन शेख, सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
📍शिवशंकर शिंदे / माळकूप
✍️ पारनेर न्यूज - संपादक
📲 ९७६४९७२७४७
Comments
Post a Comment